मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक बच्चन व सैयामी खेरच्या ‘घुमर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 5, 2023 | 7:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ghoomer Trailer

Ghoomer Trailer

बॉलीवूड मधील आगामी चित्रपटांची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत असतात. अनेक बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी ‘घुमर’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाले असून या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. (Ghoomer Trailer)

अभिषेक एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत पॅराप्लेजिक खेळाडूला प्रशिक्षण देताना दिसतोय तर खेळाडूची भुमिका सैयामी साकारत आहे. अभिषेक बऱ्याच चित्रपटातून चाहत्यांच्या समोर येत असतो. पण अभिषेक ‘घुमर’ या चित्रपटात वेगळ्याच भूमिकेत असून चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय.

या ट्रेलरची सुरुवात अभिषेक बच्चनच्या डायलॉगने होते, यात मद्यधुंद अवस्थेत दिसतो. तर या चित्रपटात सैयामी खेरचा बॉयफ्रेंड अंगद असतो. पण तिच्यासाठी क्रिकेट तिच्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ येतं आणि एका अपघातात तिचा एक हात तिला गमवावा लागतो. त्यानंतर तिच्या संघर्षाची कथा सुरु होते. मग तिची संघर्ष गाथा आणि त्यानंतर तिला मिळणारं फळ काय, हे आपल्याला या चित्रपटात पहायला मिळेल.(abhishek bachchan)

या चित्रपटाची कथा हंगेरियन नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून प्रेरित आहे. तिच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती. आर. बल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका पेक्षा एक सरस चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांना ‘घुमर’ या चित्रपटातून नवीन कथा पाहायला मिळणार आहे. ‘घुमर’ च्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स करत सिनेमाचं कौतुक केलंय.

Tags: abhishek bacchanghoomer trailer
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar

"तो बघ, जगातला सर्वात सुखी माणूस चाललाय…" 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याविषयी सचिन - सुप्रिया यांनी केलेलं वक्तव्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.