गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियारवर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात, ऐश्वर्याला फक्त तिच्या लेकीची साथ आहे. अशा चर्चा अनेकदा होताना पाहायला मिळाल्या. तसंच जागतिक पातळीवर पार पडलेल्या महोत्सवात तिच्या नावातून बच्चन आडनाव हटवल्यानंतर ऐश्वर्या व बच्चन कुटुंबियांमध्ये काही आलबेल नसल्याचेही वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एका कौटुंबिक सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या एकत्र आनंदी असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच नुकतेच अभिषेक आणि ऐश्वर्याने यंदाचे नवीन वर्ष एकत्र साजरे केले आणि आता ते मुंबईला परतले आहेत. (Abhishek and Aishwarya Bachchan returning mumbai)
अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघे ४ जानेवारीला सकाळी मुंबई विमानतळावर आराध्याबरोबर दिसले होते. यावेळी त्यांनी विमानतळावर अगदी आनंदाने सर्वांना अभिवादन केले. यावेळी अभिषेकने राखाडी रंगाची हुडी परिधान केली होती, तर ऐश्वर्या आणि आराध्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसंच ऐश्वर्याने पापाराझींना अभिवादन करत २०२५ या नवीन वर्षाच्या खास शुभेच्छाही दिल्या. यावेळी अभिषेक बायको व पत्नीची काळजी घेतानाही दिसला. त्याने ऐश्वर्या आणि आराध्याला आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि नंतर त्याच कारमधून घराकडे निघाले.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनला कोर्टाकडून मोठा दिलासा, संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेत्याला जामीन
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही खूश झाले आहेत आणि त्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आपली मतंही व्यक्त केली आहेत. या व्हिडीओखाली एकाने असं लिहिलं आहे की, “दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला”. तर आणखी एका चाहत्याने म्हटलं की, “ऐश्वर्या दिवसेंदिवस अधिक सुंदर होत आहे”. त्याचबरोबर आणखी एका नेटकऱ्याने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, “हे दोघे नेहमी एकत्र होते. आताही आहेत आणि यापुढेही कायम एकत्रच रहावेत”.
आणखी वाचा – 04 January Horoscope : सिद्धी योगाचा शुभ योगामुळे मकर राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा, जाणून घ्या…
दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या अलीकडेच त्यांची मुलगी आराध्याच्या १३व्या वाढदिवसानिमित्त एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दोघे तिच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला एकत्र आले होते. त्यानंतर आता त्यांचा हा व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये अभिषेक व ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर एकत्र पाहायला मिळाले.