आई कुठे काय करते ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.मालिकेतील कथानक सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधतंय. या मालिकेत सध्या एकीकडे आशुतोष आणि अरुंधती यांच्यातील प्रेम बहरताना दिसतंय तर ईशा आणि अनिश यांच्यातील नात्याला सध्या अरुंधती विरोध करताना दिसते, तर आजच्या भागात ईशा अनिशला आपण पळून जाऊन लग्न करू असा निर्णय घेते आणि ती अनीशला सांगते,अनिश तिची समजूत काढतो पण ती ऐकताच नाही. तर आता यावर ईशा मोठं पाऊल उचलणार आहे.(Isha Arundhati)

नुकतंच समोर आलेल्या भागात, ईशा अनिशसोबत वाद घालत असते. आपण लग्न करू आणि आताच आपण लग्न केलं पाहिजे, गौरी-यशचं पाहिलं ना काय झालं. एकमेकांसोबत जास्त असेच फिरतात मग कंटाळा येतो आणि मग लग्न नाही होत. असं ईशा अनिशला बोलते.अनिश यावर असं काही नाही ईशा मी तुझ्यासोबत लग्न करेल. पण मला दोन वर्ष दे. आपण स्वप्न पाहिलीत काही ती पूर्ण करायची आहेत. असं सांगतो पण ईशा काही ऐकूनच घेत नाही, ती त्याच्यावर चिडते आणि अनिश तिला समजावत असतो. हे सर्व अनिरुद्ध बघतो आणि तो चिडतो.
हे देखील वाचा: ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
अनिरुद्ध अनिशवर हात देखील उचलतो, पण ईशा बाबांना आमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणते .तेव्हा अनिरुद्ध तिला घरात घेऊन जातो.आणि घरांच्यासोबत ईशावरदेखील चिडतो. तर ईशा स्वतःला खोलीत कोंडून घेते. तर ती अनिश सोबत लग्न करण्यासाठी कोणतं पाऊल उचलणार?, देशमुखांचं कुटुंब यांच्या लग्नासाठी तयार होणार का ?,अरुंधती यशाची समजूत काढणार का?, की अनिरुद्ध या सर्वासाठी अरुंधतीला दोष देणार? हे सर्व पाहणं उत्सुकतेचं असणार आहे?(Isha Arundhati)
यासोबतच मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. त्या दोघांना असं आंनदी पाहून सुलेखाताई देखील खूप खुश झाल्यात.