रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 23, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte serial fame actress Rupali Bhosle shared photo with Kushal Badrike and said she is proud of him

रुपाली भोसलेने कुशल बद्रिकेबरोबरचा फोटो पोस्ट करत तुझा वाटतो असं म्हटलं आहे

‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. कुशलला त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग, हटके विनोद शैली ही त्याला इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवते. विनोद विश्वात आपल्या अनोख्या स्टाइलने नाव कमावणाऱ्या कुशल बद्रिकेचे एका कलाकाराने कौतुक केले आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते’ मालिका फेम रुपाली भोसले. (Rupali Bhosle Proud Kushal Badrike)

रुपाली भोसलेने कुशलबरोबरचा नागपूर विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह तिने कुशलचे कौतुक केलं आहे. रुपालीने या फोटोखाली लिहलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “नागपूर विमानतळावर अचानक मला हा माझा सहकलाकर भेटला. एकमेकांचं कौतुक करत होतो आणि अभिमान वाटत होता. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात कुशल बद्रिके होता. आता २० वर्षाहून जास्त काळ झाला आणि हा मुलगा जरा सुद्धा बदलला नाही. पण या मुलाने जे काही काम केलं आहे ते कमाल आहे”.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

आणखी वाचा – ‘बाई वाड्यावर या…’वर कंटेट क्रिएटर्सने बनवला व्हिडीओ, निळू फुलेंची लेक भडकली, तर प्रसाद ओक म्हणाला, “यांची एवढीच कुवत…”

यापुढे रुपालीने “कुशल टाइमिंगची कमाल जाण असलेला आणि हाडामासाचा कलाकार आहे. मी करिअरची सुरुवात या कमाल कलाकाराबरोबर केली याचा मला आनंद आहे. कुशल तुझा अभिमान वाटतो. तुला खूप खूप शुभेच्छा” असं म्हणत त्याचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. रुपालीच्या या पोस्टखाली कुशलनेही त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “तशी आपण संघर्ष करायला एकत्र सुरुवात केली, पण तेव्हाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण आज सुपरस्टार रुपालीबरोबर माझा फोटो आला”.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला घर बांधून देण्यावरुन हिणवणाऱ्यांना अंकिता वालावलकरचं उत्तर, म्हणाली, “बाहेर आल्यानंतर कळालं की…”

दरम्यान, या फोटोला कुशल व रुपाली यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांना या फोटो आवडल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसंच दोघांनी आपल्या मेहनतीने आजवर कामावलेल्या प्रसिद्धी व लोकप्रियतेबद्दल कौतुकही केलं आहे. तसेच काहींनी “नवीन काही प्रोजेक्ट आणताय की नाही आम्हाला हसायला” असंही म्हटलं आहे.  

Tags: kushal badrikerupali bhosleRupali Bhosle Proud Kushal Badrike
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

Tharal Tar Mag : सायली-अर्जुनमध्ये पुन्हा गैरसमज, एकमेकांपासून कायमचे दुरावणार का?, नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.