‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या देशमुख कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलं आहे. कांचन आजींची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. संजना व अनिरुद्ध यांनी प्रॉपर्टीवरुन केलेल्या भांडणामुळे कांचन आजींची ही अवस्था झाली असल्याचं समोर आलं आहे. यावरुन अरुंधतीही दोघांना खूप सुनावते. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आई आजारी असल्याने चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)
मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अनिरुद्ध अस्वस्थ असतो ते पाहून संजना अनिरुद्धला म्हणते, तू आज इतका अस्वस्थ का दिसत आहेस?, हे ऐकून अनिरुद्ध म्हणतो, “आई हॉस्पिटलला आहे आणि सिरीयस आहे त्यात तू म्हणतेस सर्व ठीक आहे का?”. यावर संजना म्हणते, “तू आईनं ओळखत नाहीस का?, त्यांना नाटक करायची सवय आहे. एवढंसं काही झालं तर त्या एवढं करुन दाखवतात”. यावर अनिरुद्ध म्हणतो, “आयसीयूमध्ये आहे ती आणि तू म्हणतेस नाटक करतेय”, असं म्हणत तो संतापतो. यावर संजना म्हणते, “तू का त्रास करुन घेत आहेस. तुला अचानक त्यांचा का पुळका आला आहे”.
यावर अनिरुद्ध बोलतो, “काळजी करणं म्हणजे पुळका आहे का?, आई आहे ती माझी. आपण केलेल्या भांडणामुळे तिला त्रास झाला हे मान्य करायला हवे. उगाच बोलण्याच्या ओघात मी जास्त बोलून गेलो”. यावर संजना अनिरुद्धला बोलते, “तू स्वतःला जास्त त्रास करुन घेऊ नकोस. या सगळ्याला आई आणि अप्पा जबाबदार आहेत. त्या दोघांनी आपलं ऐकलं असतं तर हे सर्व झालं नसतं”. त्यानंतर अनिरुद्धला रडू येत आणि तो बोलतो, “आईला लवकरात लवकर बरं वाटायला हवं. आईला काही झालं तर मी स्वतःला माफ करु शकणार नाही”.
यावर संजना अनिरुद्धला शांत करते. आणि बोलते, “आईच वय बघता कधीही काही होऊ शकतं. आणि आजच हे भांडण निमित्त होतं. आई काय पुढची ५० वर्षे जगणार नाही आहे. मला तर वाटत की, तू प्रॉपर्टीचे पेपर वकिलांकडून तयार करुन घे. आणि त्यांना जरा बरं वाटलं की, त्यांच्याकडून सह्या करुन घे”. हे ऐकून अनिरुद्धचा पार चढतो आणि तो संजनाला शांत करतो. यावर शांत न बसता संजना म्हणते, “आता इमोशनल होऊन मागे येण्याची वेळ नाही आहे. तू चार पावलं मागे येशील आणि हे लोक तुला मूर्ख बनवतील”, यावर अनिरुद्ध संजनाला विनंती करतो की, “आता आपण या विषयावर नको बोलायला. माझी आई आयसीयूमध्ये आहे”.