Rupali Bhosale Video : अभिनयाबरोबरच अनेक अशी कलाकार मंडळी आहेत जी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहत आहेत. अनेक कलाकार विविध व्यवसाय करताना दिसत आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईने व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे. आईच कौतुक करत या अभिनेत्रीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले. रुपालीने आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावर रुपाली बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे रुपालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत रुपालीने संजना ही खलनायिकेची भूमिका साकारली होती. इंडस्ट्रीत कोणीही वारसा नसताना रुपालीने स्वमेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच रुपालीने तिची स्वप्नही पूर्ण केलेली पाहायला मिळाली. मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच रुपालीने नवी कोरी आलिशान कारही खरेदी केली. यानंतर आता तिच्या आईच एक स्वप्न पूर्ण झालं आहे. शिवाय स्वतःच क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट असावं अशीही रुपालीची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल यांत शंका नाही.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक विशाल ददलानीचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, नक्की काय घडलं?
रुपालीची आई जेवणाच्या ऑर्डर्स घेते.आणि शुटिंगमधून वेळ मिळाल्यावर रुपाली तिच्या आईला मदतही करते. असाच मदत करतानाचा व्हिडीओ शेअर करत रुपाली म्हणाली की, “हाय-हॅलो नमस्कार. आजचा बेत आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या. आमच्या कोकणात काळ्या वाटाण्याच्या उसळीला एक वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक सणावाराला, शुभकार्याला ही काळ्या वाटाण्याची उसळ हमखास बनवली जाते. बरं, मी आता जेवण करतेय ते सगळं ऑर्डरचं आहे”.
तिने पुढे म्हटलंय की, “माझ्या आईने जेवणाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. ही तिची चौथी-पाचवी ऑर्डर आहे. मोदकापासून या प्रवासाला सुरुवात झाली. मग पुरणपोळ्या, फिश, व्हेज बिर्याणी आणि आज काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळ्या. आता मी घरी असल्यामुळे आईला मदत करु शकतेय. आमचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे. एखादं क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट सुरु करायचं. बघु आता ते कधी सुरु होतंय पण, त्याआधी माझ्या आईला या नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. होईलचं लवकर सगळं सुरु”.