Ankita Prabhu Walawalkar Engagement : सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंकिता वालावलकरच्या लग्नाची. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. कोकणात म्हणजेच देवबाग मालवण येथे यांचा हा भव्य शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. कालपासून अंकिता व कुणालची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अंकिता व कुणालच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काल तिचे मेहंदी समारंभाचे फोटो समोर आले. यानंतर आता अंकिता व कुणाल यांचा साखरपुडा समारंभ पार पडला असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभाचे अनेक फोटो समोर आले आहेत.
अंकिता व कुणाल यांनी कुटुंबियांच्या, जवळच्या नातेवाईकांच्या, मित्र-मंडळींच्या उपस्थितीत हा साखरपुडा समारंभ उरकला आहे. यावेळी दोघांचा पारंपरिक लूक साऱ्यांचं लक्ष वेधून आहे. यावेळी अंकिताने गडद हिरव्या रंगाची काठपदरची साडी नेसली आहे. तर कुणालने प्रिंटेड जॅकेट आणि कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. तसेच साखरपुड्यावेळी गणेशपूजा करतानाचा तिचा व्हिडीओही धनंजय पोवारने पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – Video : ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या आईने सुरु केला नवा व्यवसाय, जेवणाच्या ऑर्डर व तयारीसाठी लेकीची मदत

या विधीच्या व्हिडीओमध्ये अंकिता आणि तिचे आई-वडील बसलेले पाहायला मिळत आहे. यावेळी अंकिताचा थोडासा मॉडर्न लूक दिसत आहे. तिने अंजिरी रंगाच्या शेडमधली साडी नेसली आहे, ज्यावर तिने हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस परिधान केला आहे. या लूकमध्येही अंकिता फारच छान दिसत आहे. माहितीनुसार, उद्या, १५ फेब्रुवारीला अंकिता वालावलकरची हळद आहे. तर १६ फेब्रुवारीला अंकिता कुणालसात फेरे घेत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर कुणाल भगत मराठी सिनेविश्वात सक्रिय आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटासाठी त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय ‘झी मराठी’ची मालिका ‘लक्ष्मी निवास’, ‘तुला जपणार आहे’ यांनाही कुणालने संगीत दिलेलं आहे. कुणाल-करण अशी या संगीतकारांची जोडी असून, या दोघांनी मिळून अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केलेलं आहे.