Chhaava Public Review : विक्की कौशल अभिनीत भव्यदिव्य असा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ अखेर आज १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बरेच दिवस या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला. असं असलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. आणि अनेकांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचं, कथेचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. ट्विटरवर येणाऱ्या या प्रतिक्रिया अनेकांना चित्रपट पाहण्यास उत्सुक करत आहेत. विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्यासारख्या कलाकारांसह या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चित्रपटातील लढाईच्या दृश्यांपासून ते भावनिक अभिनयापर्यंत ‘छावा’ ची खूप प्रशंसा होत आहे. बर्याच लोकांनी विकी कौशलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून वर्णन केले आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपट चांगला असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. चाहत्यांनी सांगितले की, चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजक आहे आणि एक शक्तिशाली जाणीव प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करत आहे. एक गोष्ट ज्यावर जवळजवळ सर्व नेटिझन्स सहमत आहेत ती म्हणजे विक्की कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत जोरदार अभिनय केला. “छावाचा क्लायमॅक्स तुम्हाला स्तब्ध आणि अवाक करेल! या चित्रपटाची इंटेन्सिटी, भावना आणि पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स तुमच्या अंगावर शहारे आणेल! विकी कौशलने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय या सिनेमात केला आहे. तर अक्षय खन्नाचं काम जबरदस्त आहे”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक विशाल ददलानीचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, नक्की काय घडलं?
#ChhaavaReview – A Powerful Tale of Courage and Sacrifice
— Asad (@KattarAaryan) February 13, 2025
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️ (4/5)#Chhaava is a cinematic masterpiece, blending grandeur, emotion, and inspiration. Director #LaxmanUtekar brilliantly brings to life the heroic saga of #ChhatrapatiSambhajiMaharaj with stunning… pic.twitter.com/qRak0L3BkU
लोकांनी देशभक्तीची गाणी आणि युद्धाची थीम मनोरंजक असल्याचं म्हणत स्तुती केली आहे परंतु काही प्रेक्षकांना असे वाटते की ऐतिहासिक नाटकासाठी संगीत थोडे विचित्र आहे. एकंदरीत, ट्विटरवर लोकांच्या प्रतिक्रिया ‘छावा’बाबत सकारात्मक आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका, अभिनय, भव्य युद्ध, दृश्ये आणि भावनिक भागांसाठी कौतुक केले गेले आहे. चित्रपट समीक्षकांकडूनही चित्रपटाला चांगले रेटिंग मिळालेलं पाहायला मिळत आहेत.
#OneWordReview..#Chhaava : SPECTACULAR.
— Panda (@Abhi32428072) February 13, 2025
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️⭐
Blends history, emotions, passion, patriotism, action with finesse… #VickyKaushal terrific, cements his stature as one of the finest actors of his generation.
#ChhaavaReview
One of the best movie of vicky life🔥🔥🔥 pic.twitter.com/z5v5lnhOsI
‘छावा’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती अखेर प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला आहे. आधी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग जबरदस्त झालं आणि करोडोंचा आकडा पार केला. आता प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.