सध्या सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. कलाकार मंडळीही दिवाळीनिमत्त अनेक फोटोस,व्हिडीओस चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. दिवाळीनिमत्त अनेकांनी खरेदी करतानाचे व्हिडीओ ही सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. तर काहींनी गाडी खरेदी केल्यानंतरचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. अशातच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गाडी खरेदी करत तिचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Apurva Gore Bought New Car)
दिवाळीच्या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधत ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. आलिशान गाडी खरेदी करणारी अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे. गाडीबरोबरचा फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. “यंदाची दिवाळी जरा जास्तच खास आहे. कृतज्ञता व प्रेमाने या नवीन सदस्याचे स्वागत करत आहे.” असं कॅप्शन देत तिने तिच्या नव्या गाडीचं स्वागत केलं आहे.
अपूर्वाच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी, रेवती लेले, खुशबू तावडे, भक्ती रत्नपारखी, अश्विनी कासार, साक्षी गांधी, अश्विनी महांगडे या कलाकार मंडळींनी अपूर्वाला तिच्या नव्या गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अपूर्वाने तिचा गाडीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यांत अपूर्वाच्या नव्या गाडीसह तिच्या पारंपरिक लूकने ही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशा या पात्रामुळे अपूर्वा गोरेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक ही करण्यात आलं. या मालिकेमुळेचं अपूर्वाचा स्वतःचा असा खास चाहतावर्गही निर्माण झाला आहे. मराठी मालिकेसह अपूर्वा हिंदी मालिका विश्वातही झळकली.