सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळाली. नवरात्री उत्सव संपला जरी असला तरी भाविकांमध्ये याची क्रेझ पाहायला मिळतेय. यंदाच्या नवरात्रोत्सवात अनेक कलाकार मंडळींनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. काहींच्या घरी नवदुर्गेचं आगमन झालं तर काहींनी पंडालमध्ये नवदुर्गेची पूजा केली. यावेळी अनेकांनी ठेका धरतानाचा, पूजा-आरती करतानाचे व्हिडीओ शेअर केले. अशातच सर्वांच्या लाडक्या आदेश बांदेकर यांनी देखील त्यांच्या इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये नवदुर्गेची आरती करताना आदेश बांदेकर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिसत आहेत. (Aadesh Bandekar Video)
‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून ‘दार उघड बये दार उघड’ असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आदेश बांदेकर हे मनोरंजन, राजकारणात तर सक्रीय आहेतच. पण ते सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आणखी वाचा – नवरात्रोत्सवात बंगाली स्टाईलने सई लोकूरने धरला ठेका, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात पहिल्यांदा…”
सोशल मीडियाद्वारे ते आपल्या अनेक दैनंदीन गोष्टी व कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बांदेकरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दुर्गामातेच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर आणि त्यांचे कुटुंब आरती म्हणताना दिसत आहेत. आरती करत भक्तीत तल्लीन झालेल्या या भाविकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये, सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकरही आरती म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत बांदेकरांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. “तुमच्या घरामध्ये साजरे केलेले सण बघून वाटतं, अशी जपावी संस्कृती”, “टाळ एक नंबर वाजवत आहे”, “याला म्हणतात संस्कार”, “सोहम चक्री छान वाजवतोय”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत कौतुक केलं आहे.