मराठी बिग बॉस मुळे चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. बिग बॉस मुळे त्यांची ही मैत्री अधिक घट्ट झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांच्यातील ही मैत्री अधिक वाढत गेली. बरेचदा अमृता आणि प्रसाद यांच्यात मैत्री पलीकडचं नातं आहे अशी भाष्य केलं जायचं, मात्र त्यांच्यात मैत्री व्यक्तिरिक्त काही नाही असं त्यांनी बरेचदा सांगितलंय. आता मात्र या चर्चेला अमृता आणि प्रसाद यांनी पूर्णविराम दिला आहे. (Amruta Prasad Wedding)
प्रसाद आणि अमृता नेहमीच त्यांच्या दोघांचे फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. चाहतेही त्यांच्या या फोटोसवर भरभरून प्रतिसाद देतात. अशातच अमृताने प्रसाद सोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यांत त्यांनी आमचं ठरलं म्हणत खुश खबर दिली आहे.
पाहा कधी करणार आहेत अमृता प्रसाद लग्न (Amruta Prasad Wedding)
अमृताने प्रसादसोबतचा रिंग फ्लोन्ट करतानाच एक फोटो पोस्ट केला आहे, यांत अमृताने We’re Engaged! ♥️ ????
We are officially nominating each other as permanent team members and we are ready to face any tasks that come our way. असं म्हणत गॉड बातमी दिली आहे.
हे देखील वाचा – स्वानंदी आणि आशिष अडकणार लग्नबंधनात
सोबत त्यांनी लग्नाची तारीख ही घोषित केली आहे. १८ नोव्हेंबरला ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. अमृता प्रसादने दिलेल्या या गोड बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तर तुम्हाला ही जोडी आवडते का, या जोडीला एकत्र आलेलं पाहून तुम्हाला आनंद झाला आहे का आम्हाला कमेंट
