रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं…’ मणिपूर घटनेवर संतापली हेमांगी कवी

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 21, 2023 | 5:31 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
hemangi kavi angry on manipur violance

hemangi kavi angry on manipur violance

संपूर्ण देशभरात एका घटनेने खळबळ माजली आहे. मणिपूर येथे गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु असून या हिंसाचारादरम्यानचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली. या व्हिडिओचे सर्वत्र पडसाद उमटण्याबरोबरच अनेकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. मणिपूरातील या घटनेवर केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर कलाक्षेत्रातील अनेक व्यक्तींनीही आपला संताप व्यक्त केला आहे. (hemangi kavi angry on manipur violance)

अभिनेत्री हेमांगी कवी अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असून ती विविध मुद्द्यांवर आपलं सडेतोड मत मांडते, ज्याची चर्चा सतत होत असते. हेमांगी नाटक, मालिका तर करते, शिवाय ती अनेक फोटोज व व्हिडिओस शेअर करताना दिसते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकरी कधी प्रतिक्रिया देतात, तर कधी ट्रोल करतात. पण तरीसुद्धा ती बिनधास्तपणे आपले मत मांडतच राहते, त्यामुळे ती अनेकदा चर्चेत येते. (hemangi kavi)

पहा काय म्हणाली हेमांगी कवी ? (hemangi kavi angry on manipur violance)

hemangi kavi post
hemangi kavi (Image : instagram)

आता हेमांगीने या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हेमांगीने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून ज्यात ती म्हणते, “मणिपूर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं social media वर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती clip आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?”

hemangi kavi facebook post

हेमांगीची ही फेसबुक पोस्ट तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केली असून तिच्या फेसबुकवरील पोस्टवर नेटकरी कमेंट्सद्वारे व्यक्त होत आहे. तसेच या मुद्द्यांवर कलाक्षेत्रातील अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिलेली असून ज्यात लेखक सचिन मोटे, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता हेमंत ढोमे, अभिनेत्री रुचिरा जाधव यांसारखे अनेक कलाकार आहे. (manipur violance)

हे देखील वाचा : “वाटेल ते बोलत सुटले लोक अन्…” रवींद्र महाजनींच्या निधनानंतर टीका करणाऱ्यांवर हेमांगी कवीचा संताप, म्हणाली, “असं मरण…”

Tags: facebook posthemangi kavimanipur violancesocial mediatrending
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
kedar shinde has promised soham to play lead role in his upcoming project

मी वचन दिलंय… केदार शिंदेंच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सोहम दिसणार मुख्य भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.