संपूर्ण देशभरात एका घटनेने खळबळ माजली आहे. मणिपूर येथे गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु असून या हिंसाचारादरम्यानचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली. या व्हिडिओचे सर्वत्र पडसाद उमटण्याबरोबरच अनेकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. मणिपूरातील या घटनेवर केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर कलाक्षेत्रातील अनेक व्यक्तींनीही आपला संताप व्यक्त केला आहे. (hemangi kavi angry on manipur violance)
अभिनेत्री हेमांगी कवी अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असून ती विविध मुद्द्यांवर आपलं सडेतोड मत मांडते, ज्याची चर्चा सतत होत असते. हेमांगी नाटक, मालिका तर करते, शिवाय ती अनेक फोटोज व व्हिडिओस शेअर करताना दिसते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकरी कधी प्रतिक्रिया देतात, तर कधी ट्रोल करतात. पण तरीसुद्धा ती बिनधास्तपणे आपले मत मांडतच राहते, त्यामुळे ती अनेकदा चर्चेत येते. (hemangi kavi)
पहा काय म्हणाली हेमांगी कवी ? (hemangi kavi angry on manipur violance)
आता हेमांगीने या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हेमांगीने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून ज्यात ती म्हणते, “मणिपूर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं social media वर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती clip आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?”
हेमांगीची ही फेसबुक पोस्ट तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केली असून तिच्या फेसबुकवरील पोस्टवर नेटकरी कमेंट्सद्वारे व्यक्त होत आहे. तसेच या मुद्द्यांवर कलाक्षेत्रातील अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिलेली असून ज्यात लेखक सचिन मोटे, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता हेमंत ढोमे, अभिनेत्री रुचिरा जाधव यांसारखे अनेक कलाकार आहे. (manipur violance)
हे देखील वाचा : “वाटेल ते बोलत सुटले लोक अन्…” रवींद्र महाजनींच्या निधनानंतर टीका करणाऱ्यांवर हेमांगी कवीचा संताप, म्हणाली, “असं मरण…”