आई कुठे काय करते मालिकेने आणि मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांची या मालिकेमधील कांचन देशमुख ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अर्चना या सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतात. (Aai kuthe kay karte sad news)
अशातच अर्चना यांच्यावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्चना यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी अर्चना यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर वडिलांसोबतच्या फोटोसोबत पोस्ट करून दिली आहे.
पाहा पोस्ट करत काय म्हणाली (Aai kuthe kay karte sad news)
अर्चना यांनी वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘माझे वडील श्री मधुकर व्यंकटेश पांढरे ह्यांचं दिनांक ८ जुलै २०२३ रोजी सकाळी निधन झाले. ह्यावेळी आप्तेष्ट व मित्र परिवार यांनी आमच्या दुःखात सहभागी होऊन जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. बाबांच्या आत्म्यास सदगती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!
पांढरे परिवार आणि पाटकर परिवार’
हे देखील वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधल्या समीरच्या भूमिकेसाठी या अभिनेत्याला होती पहिली पसंती
अर्चना यांनी वडिलांसोबत पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली. अर्चना पाटकर यांनी अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अर्चना पाटकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील कांचन देशमुख या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.
