साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या अपघाताशी संबंधित बातम्या सतत चर्चेत असतात. ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा श्री तेजा गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. अल्लू अर्जुन आणि तेज यांची अद्याप भेट झालेली नाही. अशातच आता त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. (Pushpa 2 premiere stampede incident)
श्री तेजाच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी हैदराबादचे पोलीस आयुक्त रुग्णालयात पोहोचले. यावेळी तेलंगणाच्या आरोग्य सचिव क्रिस्टीना झेड चोंगथू उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल दुःखद माहिती दिली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ती माहिती अशी की, जखमी मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदू डॅमेज झाला आहे. ही स्थिती सुधारण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा – आजारपणामुळे अमोलचे गंभीर हाल, चालताही येईना अन्…; अवस्था बघून सर्वांनाच दु:ख अनावर
याबद्दल ते असं म्हणाले की, “चेंगराचेंगरीच्या वेळी श्वास घेता न आल्याने श्री तेजाचे मेंदूला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्याच्यावर सध्या व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत आणि हे उपचार लांबण्याची शक्यता आहे”. श्रीतेजा प्रकृतीबाबत डॉक्टर लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्यात येईल. तसंच आरोग्य सचिव डॉ. क्रिस्टिना यांनी सांगितले की, “आम्ही श्रीतेजाच्या प्रकृतीचे नियमितपणे निरीक्षण करत आहोत आणि ते लवकर बरे होण्याची आशा आहे”.
दरम्यान, अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि म्हटलं आहे की, “मी श्रीतेजाच्या प्रकृतीबद्दल खूप काळजीत आहे. या घटनेनंतर तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कायदेशीर प्रक्रियेमुळे मला यावेळी त्याची भेट टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मी त्याच्या कुटुंबासोबत आहे आणि त्यांच्यावर उपचार आणि मदत करण्यास मी बांधील असल्याच अल्लु अर्जुनने सांगितलं आहे. तो लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे”.