एव्हरग्रीन अणि अभिनेत्यांमध्ये अणि बॉलिवूड मधील महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमार सध्या’OMG २’ या चित्रपटात झळकणार आहे. OMG च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.नुकताच ‘OMG २’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून अक्षय विशेष चर्चेत आहे.(akshay kumar omg 2)
मागचा बराच काळ लागोपाठ अक्षयचा कोणताही चित्रपट बॉक्सऑफिसवर स्वतःची छाप पाडू शकला नाही.रामसेतू, सेल्फी, रक्षाबंधन,बच्चन पांडे. हे अक्षयचे लागोपाठ फ्लॉप गेलेले चित्रपट आहेत.या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट ला ‘OMG २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. हे वाद सुरु असतानाचं अक्षय कुमारबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमारने केली मानधनात घट (akshay kumar omg 2)
समोर आलेल्या माहितीनुसार असं म्हंटल जात आहे की. लागोपाठोपाठ चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे याची झळ अक्षयच्या मानधनाला देखील बसली आहे. अक्षयने त्याच्या मानधनात घट केली आहे.पूर्वी एका चित्रपटासाठी अक्षय ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घ्यायचा. परंतु ‘OMG २’ साठी अक्षयने ३५ कोटी रुपयांइतकंच मानधन घेतलं आहे.परंतु या बातमीला कोणता अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.(akshay kumar omg 2)

OMG 2 या चित्रपटाच्या टिझर नंतरच वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने देखील हा चित्रपट रिव्ह्यूसाठी पाठवला आहे. कारण, आदिपुरुषप्रमाणेच OMG 2 मुळे देखील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असा आरोप करण्यात आला आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट अक्षयच्या नावापुढे लागलेला फ्लॉप हा टॅग हटवण्यात यशस्वी ठरेल का ? या गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हे देखील वाचा : त्यांनीच खरंतर लोकशाही धोक्यात आणली ! सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत