सिनेमाविश्वात आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासोबतच वेगवगेळ्या क्षेत्रात काम केलं आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत मात्र त्यांनी आपल्या कामाचा कधीच दिखावा केला नाही. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांनी केलेलं काम कोणाच्या नजरेत न आणता करतात. सध्या बाईपण भारी देवा चित्रपटाची चर्चा असल्याने कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अशातच अभिनेत्री सुकन्या मोने यांनी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली.(Sukanya Mone Story)
सुकन्या मोनेसुद्धा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत.’ एका मुलाखतीदरम्यान त्या दरवर्षी एक मुल दत्तक घेत असल्याचं समोर आलं आहे. त्या म्हणाल्या “आम्हा भावंडांना आमच्या आई-वडिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. आपल्याला मिळणारे पैसे कुठे गुंतवायचे किंवा ते कसे खर्च करायचे हे मी त्यांच्याकडूनच शिकले.
पाहा समाजकार्यात सुकन्या मोने यांची मोठी कामगिरी (Sukanya Mone Story)
काही रक्कम मी देवधर्मासाठी देते, तर काही एखाद्या संस्थेसाठी देते. मी दरवर्षी ठरवते की या या संस्थांना हे हे द्यायचं आहे आणि अशाप्रकारे मी अनेक संस्थांशी निगडित आहे. अशा अनेक एनजीओ आहेत ज्यांचं काम अजून लोकांपर्यंत फारसं पोहचलेलं नाही किंवा ज्यांच्यापर्यंत फारशी मदत जात नाही अशा एनजीओंना मी माझ्यातला काही भाग सहाय्य म्हणून देत असते.”
“बाहेरगावचे जे आश्रम आहेत त्यातील दरवर्षी मी एका मुलाला दत्तक घेते आणि त्याचा एका वर्षाचा सगळा खर्च उचलते. हे मला माझ्या आईकडून मिळालं आहे. कारण ती हे सगळं करत असते. आपण आपल्यावर जे पैसे खर्च करतो ते न करता जर आपण असं केलं तर आपल्याबरोबर दुसऱ्यालाही याचा आनंद मिळेल अशी एक भावना सतत माझ्या मनात असते.” असे त्या म्हणाल्या.
