Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीने नवं वादळ आलं आहे. दिशाची बहीण अनुष्का तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी किर्लोस्करांच्या घरी पोहोचली आहे. अनुष्काचा हा डाव अद्याप कोणासमोरही आलेला नाही. आल्यादिवसापासून अनुष्काने किर्लोस्कर मेन्शनमधील प्रत्येकाच्या मनात घर केलं. त्यामुळे तिच्यावर संशय घेण्याचा विषयच आला नाही. इतकंच नाही तर अनुष्काला किर्लोस्करांची मोठी सून आणि आदित्यची बायको म्हणून अहिल्यादेवींनी स्वीकारलं आहे. तर एकीकडे पारूने देखील आदित्यला तिचा नवरा मानलं आहे. मात्र हे गुपित अद्याप सावित्री सोडून कोणालाही माहित नाही.
कंपनीच्या ऍड शूटदरम्यान पारू व आदित्यचा विवाह झाला. तेव्हापासून पारूने मनोमनी आदित्यला तिचा नवरा मानलं आहे. आदित्यच्या नावाचं मंगळसूत्रही पारूच्या गळ्यात आहे. इतकंच नाही तर ते मंगळसूत्र पारू जेव्हा काढते तेव्हा आदित्यच्या जीवाला धोका संभावतो. तर एकीकडे पारूच्या सहवासात कायम असणाऱ्या आदित्यला तिची सवय होते. आदित्य पारूच्या सोबत नसण्याने कासावीस होतो. ही गोष्ट प्रीतमच्या लक्षात येते मात्र तो कोणाला काहीच बोलत नाही.
मालिकेत सध्या आदित्य, पारू व अनुष्का तिघेही अवॉर्ड सोहळ्यासाठी गेले आहेत. त्यावेळी अनुष्का योग्य तो डाव शोधून पारूचा काटा काढण्याचं ठरवते. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये अनुष्काने पारूच्या कोल्ड्रिंगमध्ये दारू मिसळलेली पाहायला मिळत आहे,आणि त्यानंतर पारू तोंडाला येईल ते बरळताना दिसत आहे. अनुष्का पारूला असं बोलताना दिसत आहे की, “आदित्य तुझा मित्र आहे ना मग मी पण तुझी मैत्रीण होऊ शकते”.
आणखी वाचा – किरण गायकवाडचा हटके संगीत सोहळा, होणाऱ्या बायकोसह खेळला गेम, एकमेकांची पोलखोल केली अन्…
दारू मिसळलेलं कोल्ड्रिंक प्यायल्यानांतर पारू अनुष्काला नशेत बोलते, “माझ्या पोटात एक सिक्रेट आहे. माझं आदित्य सरांबरोबर लगीन झालं आहे”, हे ऐकून अनुष्काला खूप मोठा धक्का बसतो. आता अनुष्काच्या या डावात पारू अडकणार का?, अनुष्का या सत्याचा फायदा घेऊन पारूचा काटा काढणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.