हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाने राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त एक खास सोहळा उपस्थित केला. शुक्रवारी झालेल्या या आकर्षक कार्यक्रमात दिग्गज सेलेब्रिटींनी हजेरी लावत राज कपूर यांच्या खास आठवणींना उजाळा दिला. या सोहळ्याला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी आणि कपूर कुटुंबाने महान अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक सेलिब्रिटींमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचाही समावेश होता. कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रेखा आपल्या बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना आणि कपूर कुटुंबातील सदस्यांना भेटताना दिसत आहेत. (Rekha meeting Amitabh Bachchan granddaughter Agastya nanda)
यावेळी अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा रेखाला पाहिल्यानंतर तिच्या जवळ गेला आणि त्यांना अभिवादन केलं. यावेळी रेखानं त्याला आपल्या मिठीत घेऊन मायेनं गोंजारलं. रेखा आणि अगस्त्य नंदा यांच्या या मन मोहरुन टाकणाऱ्या क्षणाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री रेखा या अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित प्रेमप्रकरणामुळे आजही चर्चेत असतात. याच कारणामुळे रेखा आणि अगस्त्य नंदाच्या व्हिडीओ व्हायरल झाला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
या व्हिडीओत रेखा या सर्वांची भेट घेत असताना त्यांच्यासमोर अगस्त्य नंदा आला आणि रेखा यांनी त्याला मिठी मारली. अभिनेता अगस्त्य नंदाने रेखा यांना हात जोडून अभिवादन केले, तर रेखा यांनी त्याला आशीर्वाद देताना त्याचा चेहऱ्यावरून हात फिरवला. अगस्त्य आपल्या आई श्वेता बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदा यांच्याबरोबर कार्यक्रमाला उपस्थित होता. अगस्त्य आणि नव्या यांचे कपूर कुटुंबाशी नात आहे, राज कपूर यांच्या कन्या रितू नंदा, त्यांच्या आजी आहेत.
आणखी वाचा – किरण गायकवाडचा हटके संगीत सोहळा, होणाऱ्या बायकोसह खेळला गेम, एकमेकांची पोलखोल केली अन्…
दरम्यान, राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कार्यक्रमापूर्वी कपूर कुटुंबाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही या सोहळ्याचं आमंत्रण दिलं. शुक्रवारी मुंबईत राज कपूर यांच्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. हा महोत्सव १३ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये राज कपूर यांच्या सर्वात प्रतिष्ठित १० चित्रपटांचं प्रदर्शन देशातील विविध शहरात होणार आहे.