शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्राला लाभलेले गतवैभव…” नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मराठी कलाकारांच्या खास शुभेच्छा, म्हणाले, “नागरिक म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2024 | 9:45 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Prathanna Behere, Mugdha Vaishampayan Megha Dhade congratulated Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Ajit Pawar and Eknath Shinde after taking oath.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच मराठी कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली होती. (Marathi artists wish Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Ajit Pawar and Eknath Shinde)

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले. रणवीर सिंग, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, विद्या बालन यांसारखे कलाकार या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्याचबरोबर काही मराठी कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच राज्यात जल्लोष साजरा केला जात आहे.

आणखी वाचा – 05  December Horoscope : कर्क, सिंह, मकर राशीच्या लोकांना शुक्रवारी नशिबाच्या मदतीने मिळणार लाभाच्या संधी, जाणून घ्या…

काही मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सुद्धा नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने “अविस्मरणीय क्षण” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथ घेतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. तर अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : नवऱ्याचं यश पाहून मुग्धा वैशंपायनचा आनंद गगनात मावेना, प्रथमेशचा व्हिडीओही केला शेअर

त्याचबरोबर गायक मंगेश बोरगावकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत “आपल्या महाराष्ट्राला लाभलेले गतवैभव पुढील काळात पुन्हा एकदा प्राप्त होवो, हीच नागरिक म्हणून मनापासून इच्छा” असं म्हटलं आहे. तर ‘सारगेमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायिका मुग्धा वैशंपायनने देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत मनःपूर्वक अभिनंदन मा. देवेंद्रजी” असं म्हटलं आहे

Tags: Mangesh Borgaonkarmegha dhademugdha vaishampayanprarthana behere
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Sambhavna Seth Says Miscarriage
Entertainment

डॉक्टरांच्या चुकीमुळे पोटातच बाळ गेलं, १५ दिवस कळलंच नाही अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार, जीवाशी खेळ

मे 8, 2025 | 1:30 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : आदित्यला पारुच्या प्रेमात असल्याची जाणीव होणार का?, अनुष्काचाही होतोय जळफळाट, नवा डाव आखणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.