अनेक हिंदी चित्रपटांच्या चलतीमध्ये देखील मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले पाय घट्ट रोवत पहिल्याच आठवड्यात ६ करोडहूनही अधिक कमाई केली तो चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा. केदार शिंदेंचं दिग्दर्शन, आणि ज्या गुणी अभिनेत्रींनी मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आणि काळाप्रमाणे टिकवून ही ठेवलं त्या म्हणजे अभिनेत्री वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर,रोहिणी हट्टंगडी,शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. (Vandana Gupte Love Story)
चित्रपटाच्या घोषणेपासूनच इतकी कमालीची स्टार कास्ट असणारा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षकांना भयंकर उत्सुकता होती, आणि म्हणूनच चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. चित्रपटाला यश मिळण्यासाठी, चांगली कथा,कलाकार जितके महत्वाचे असतात, तितकंच महत्वाचं असत, चित्रपटाचं प्रमोशन .बाई पण भारी देवा या चित्रपटाचं प्रमोशन सुरवातीपासूनच अगदी दणक्यात सुरु आहे,चित्रपटाच्या रिलीज नंतरही कलाकार प्रेक्षकांना भेटत आहेत.
असच बाई पण भारी देवाच्या अभिनेत्री, महाराष्ट्रातील गृहिणींचा लाडका कार्यक्रम होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यावेळेस आदेश भाओजींनी सगळ्यांनाच एक प्रश्न विचारला की नवऱ्यवरचा राग व्यक्त कसा करता, तेव्हा वंदना गुप्तेनी त्यांच्या बघण्याच्या कार्यक्रमाचा मजेशीर किस्सा सांगितलं आहे, त्या म्हणाल्या,नवऱ्यवरचा राग व्यक्त न करताच ५० वर्ष संसार केला, नाही तर झालाच नसता.पहिल्यांदा सासू- सासऱ्यांना भेटायला गेले तेव्हा पहिल्यन्दा त्यांना लावणीचं म्हणून दाखवली, त्यामुळे त्यांना कळलं होत, आपल्या घरी काय येत आहे.

जाणून घ्या काय आहे किस्सा? (Vandana Gupte Love Story)
लग्नाआधी पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटायला त्या गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की असच वाग, तस वागू नकोस.आणि त्यांचे सासू-सासरे त्यांच्या आईच्या गाण्यांचे चाहते होते.त्यामुळे त्यांची मुलगी आपली सून होणार म्हणून सासू-सासरे ही उत्सुक होते. (Vandana Gupte Love Story)
त्या भेटायला गेल्या, पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना नमस्कार केला. आईच्या गाण्यांचे भक्त असल्यामुळे सासू-सासऱ्यांनी वंदना गुप्तेना विचारलं, गातेस वैगरे की नाही तेव्हा वंदना गुप्ते म्हणाल्या हो गाते, तेव्हा सासऱ्यांना वाटलं की त्याही आईसारखं भजन किंवा अभंग वैगरे गातील,परंतु तेव्हा वंदना गुप्तेनी पाडला पिकालाय आंबा हे गायलं होत, तेव्हा त्यांच्या नवऱ्याला टेन्शनच आलं होत, त्या मजेशीर पद्धतीने म्हणाल्या कि त्याने तेव्हा जी मान खाली घातलीय ती अजून वर केली नाही असं त्या सगळयांना सांगतात.
हे देखील वाचा : प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून सुकन्या मोने झाल्या भावुक