महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. सर्वसामान्य माणूस असो वा कलाकार मंडळी प्रत्येक जण हा हास्यजत्रेच्या प्रेमात आहे. यांत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची निवेदक प्राजक्ता माळीही मागे राहिलेली नाही. प्राजक्ताला ही वैयक्तिकरित्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम विशेष आवडतो. हास्यजत्रेतील अनेक फोटोस आणि व्हिडीओज ती नेहमीच सोशल मीडियावरून पोस्ट देखील करत असते. अशातच प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सर्वाधिक कोण आवडत? याबाबत प्राजक्ताने एका व्हिडिओमधून सांगितलं आहे.(prajakta mali’s favourite actor)
प्राजक्ता माळीच्या ऑफिशिअल फॅन पेजवरून सोनी मराठी वाहिनीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिला सर्वात जास्त कोण आवडतं याबाबत बोलतेय. अभिनेत्री प्राजक्ता माळी बोलतेय की, ‘सगळेच खूप भारी आहेत. असा एकच कोणी फेव्हरेट किंवा कमालीचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण सगळ्यांची वैशिष्ट्य आणि परफॉर्मन्स स्टाइल वेगळी आहे, प्रत्येकाचा ह्युमर वेगळा आहे. मुळात सगळे माझे जिगरी दोस्त आहेत.’
पाहा प्राजक्ताला आवडते ही व्यक्ती अखेर सत्य आलं समोर (prajakta mali’s favourite actor)
यापुढे बोलताना ती म्हणालीय की, पण त्यातल्यात्यात सांगायचं झाल्यास ‘मी त्याच्याविषयीचं प्रेम लपवू शकत नाही. ‘वाह दादा वाह’ समीर चौघुले ही माझी सर्वात आवडती व्यक्ती आहे. कलाकार म्हणून तो तर तो कमाल आहे, पण माणूस म्हणून तो खूप कमाल आहे. तो मराठीतील चार्ली चॅप्लिन वाटतो. त्याच्या रिअॅक्शन, त्याचे विनोद प्राजक्ता म्हणून मला जास्त आवडतं. सीनिअर फळीत तो आहे, तर ज्युनिअर सगळेच कमाल आहेत. मी त्यांच्यात निवडू शकत नाही’.(prajakta mali’s favourite actor)
हे देखील वाचा – रायाच्या शोकसभेत सिंधु आणि मधु राणीने धरला ठेका
महाराष्ट्रची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हणजेच दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत आवडता विनोदवीर कोण असे विचारले असता समीर चौगुलेचं नाव घेतलं आहे.
