“विठू नामी रंगला देह” असं म्हणत वारकऱ्यांची पाऊलं आता पंढरीच्या दिशेने पडताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यातून, गावांमधून असंख्य वारकरी पांडुरंगाचा जप करत वारीमध्ये दंग झालेले दिसतायत. महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांसाठी Itsmajja येत्या २० जूनला घेऊन येत आहे एक नवीन कोरं भक्तीगीत “जाऊ पंढरीला”(Jau Pandharila Song Teaser)
पाहा Itsmajja च्या या विठ्ठल भक्तिगीताचा खास टिझर(Jau Pandharila Song Teaser)
जाऊ पंढरीला हे गाणं विठ्ठलभक्तांच्या मनात असलेल्या पांडुरंगाच्या ओढीत अजून भर टाकणारं असेल. या गाण्याचं लेखन, दिगदर्शन गायक स्वप्नील गायकवाड यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्वाचं मानला जाणारा आणि अनेक विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची परिभाषा मानला जाणारा सण म्हणजे वारी. या वारी मध्ये सहभागी होणार प्रत्येक वारकरी हा हरी नामात आपली तहान भूक हरपून चालत असतो. वारीचा हा महोत्सव जगभर अगदी आनंदानं पाहिला देखील जातो.
महाराष्ट्रातील या अखंड पारंपरिक वारीचा आणि वारकऱ्यांच्या आनंदाचा एक सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न Itsmajja ने आपल्या या नवीन गाण्यातून केला आहे. येत्या २० जूनला हे गाणं Itsmajja च्या ऑफिशियल you tube चॅनलवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्या साठी नक्की बघत राहा Itsmajja.(Jau Pandharila Song Teaser)