मालिकाविश्व गाजवल्यानंतर कलाकार मंडळी आपली पावलं सिनेसृष्टीकडे वळवतात. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ही कलाकार मंडळी आपल्या कलेने प्रेक्षकांच्या आणखी जवळ जातात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.(Shivali Parab New Movie)
या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परब हिने विनोदाचं अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनय साधत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हास्यजत्रेतील तिच्या स्किटमधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. हास्यजत्रेतील तिची मोना डार्लिंग, शीतली या भूमिका अधिक लोकप्रिय असून इतरही तिच्या भूमिकांवर चाहते भरभरून प्रेम करत असतात.
पहा शिवालीच्या नव्या चित्रपटाचं नाव काय आहे (Shivali Parab New Movie)
शिवाली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘उलगुलन’ असं शिवालीच्या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत शिवालीने त्याखाली उलगुलन’च्या नावानं चांगभलं असं कॅप्शन दिल आहे. तृशांत इंगळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.(Shivali Parab New Movie)
शिवालीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी शिवाली हिने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या किसिंग सीनची बरीच चर्चा रंगली होती. आता नव्याने शिवाली पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.(Shivali Parab New Movie)
हे देखील वाचा – मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय योगा फ्रिक अभिनेत्री
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. शिवालीने तिच्या आगामी प्रोजेक्ट्ची माहिती नुकतीच सोशल मीडियावरून दिली आहे. शिवाली नेहमीच तिचे वेगवेगळे फोटोस आणि व्हिडीओज शेअर करताना दिसते.
