Vishakha Subhedar Post : बरीचशी अशी कलाकार मंडळी ज्यांची मुलं शिक्षणासाठी, कामासाठी त्यांच्यापासून दूर परदेशात राहत असतात. आई-वडिलांपासून दूर, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. अनेक कलाकार मंडळींची मुलं परदेशात राहत असून वेळोवेळी ही कलाकार मंडळी त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून त्यांच्या मुलांना भेटायला जातात. बरेचदा कामामुळे त्यांच्यापर्यंत पोहचायला त्यांना जमत नाही. मात्र ते नेहमीच व्हिडीओ कॉल, फोनद्वारे त्यांच्याशी संपर्कात असतात. घरापासून दूर राहिल्यानंतर या मुलांनाही अधिक ओढ लागते. त्यात सण वार आले की त्यांना घराची अधिक आठवण येते.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा लेक अभिनय सुभेदार हा परदेशात शिक्षणासाठी गेला आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अभिनयने दिवाळीनिमित्त खास फराळ केला आहे. यासाठी त्याची आई विशाखा यांनी लेकाचं भरभरुन कौतुक केलं आहे. लेकाने खास दिवाळी स्पेशल बेसनचा लाडू बनवला असून त्याचे सुंदर असे फोटो शेअर करत त्यांनी अभिनयचं कौतुक केलं आहे. घरापासून दूर राहून स्वाभिमानी व स्वावलंबी झालेल्या लेकाचं त्यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “काय दिवे लावणार कुणास ठाऊक?”, पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, “संध्याकाळी…”
विशाखा यांनी लेकाने बनवलेल्या फराळाचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “पोर. अभिनय सुभेदार शिकता शिकता स्वयंपाक ही करु लागला आणि दिवाळीत स्वतः बेसनाचे लाडूदेखील केले. खूप भारी वाटतंयं. फराळ वैगेरे करण माझं कधीच मागे पडलं. पुड्याला कात्री लावली की पडला डब्यात फराळ. झाली दिवाळी. हल्ली फराळ तर १२ महिने चालूच असतो पण परदेशी गेल्यावर आपलं सगळं हट्टाने हवं असतं ना. सण, पदार्थ, भावंड, मित्र-मैत्रिणी, आई-बाबा पण ही सगळी नाती एका लाडवाच्या गोडीत असतात रे आणि त्यात तू पहिल्यांदा बनवला आहेस मग तर तो कायच्या काय उत्तम झाला असणार”.
आणखी वाचा – मृणाल कुलकर्णींच्या आईचे निधन, भावुक होत म्हणाल्या, “काही व्यक्त होण्याची ताकद नाही पण…”
पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे थोडी खारट चव आली खरी ओठांवर पण बेसन लाडूने तोंड गोड केलं बरं. तुझं खुप कौतुक. अबुली. मी घरी नसूनही तू खूप काय काय शिकलास, खरंतर त्याचमुळे तू किती स्वावलंबी झालास आणि आता तर अजून होतोयस. तुला खूप शाबासकी. कायमच तुझी वाट पाहणारी, तुझ्यासाठी जगणारी तुझी आई आणि आपला बाबाही”.