शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृणाल कुलकर्णींच्या आईचे निधन, भावुक होत म्हणाल्या, “काही व्यक्त होण्याची ताकद नाही पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 30, 2024 | 9:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Mrinal Kulkarni mother Dr. Veena Dev passed away.

दु:खद बातमी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची आई डॉ. वीणा देव यांचे निधन

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण मृणाल यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मृणाल यांना मातृशोक झाला आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  (Mrinal Kulkarni Mother Passed Away)

डॉ. वीणा देव लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यावर सध्या संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आईच्या निधनानंतर मुलगी मृणाल यांनी दु:खद पोस्ट शेअर केली आहे. फेसबुकवर भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “खरंतर आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी-अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो.

आणखी वाचा – ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर, दिवाळी नक्की कधी?, देशभरात कोणत्या राज्यात कधी होणार सेलिब्रेशन?, जाणून घ्या…

यापुढे मृणाल यांनी असं म्हटलं आहे की, “आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!” मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त करत वीणा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी तसेच साहित्यिक व मृणाल यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त करत वीणा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

आणखी वाचा – 30 October Horoscope : शुभ योगामुळे मेष, कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या…

दरम्यान, मृणाल कुलकर्णी यांच्या आई वीणा देव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालयात त्यांनी तब्बल ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. वीणा देव यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच यामुळे साहित्यविश्वही हळहळले आहे.

Tags: mrinal kulkarniMrinal Kulkarni MotherMrinal Kulkarni Mother Death
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Actor Kushal Badrike wife posted a picture of him and teased for putting up lights on Diwali.

"काय दिवे लावणार कुणास ठाऊक?", पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, "संध्याकाळी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.