हल्ली सगळीकडे लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. लग्नाचा हा ट्रेंड पाहायला मिळतोय आपापल्या आवडत्या कलाकारांमध्ये. एक लग्न असच चर्चेत आहे ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम दत्तू मोरे याचं. काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावर दत्तूच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ वायरल होऊ लागले. आणि सगळ्यांना एक सुखद आनंद मिळाला.(Dattu More Wife Information)
दत्तू ने कोणताही गाजावाजा न करता त्याच लग्न आटोपलं अशा कमेंट्स ही प्रेक्षकांनी वायरल झालेल्या पोस्ट्स वर केल्या. अचानक झालेलं लग्न? कुठे मिळाली दत्तूला त्याची ड्रीम गर्ल? कस झालं लग्न? या साऱ्या गोष्टींचा खुलासा दत्तू ने आणि त्याची बायको स्वातीने इट्स मज्जाच्या खास केळवणच्या भागात केला आहे.(Dattu More Wife Information)
दत्तूने इट्स मज्जाच्या या विशेष मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दत्तूला घरातून लागणीची परवानगी मिळाली का असं विचारलं असता दत्तू ने सांगितलं आपल्या कडे सामान्य घरातून प्रेमप्रकरणाला विरोध होतो तसाच मला ही झाला असं दत्तू ने सांगितलं. पुढे दत्तू म्हणाला कि आधी आई ने खूप विरोध केला त्यामुळे वडीलां पर्यंत ही गोष्ट गेलीच नाही. लग्नाच्या फक्त १० दिवस आधी दत्तू ने वडिलांना सांगितलं.
दत्तूच्या घरातून विरोध असला तरीही दत्तूची पत्नी स्वातीच्या घरातून या लग्नाला पाठिंबा मिळाला.