शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 22, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial update Leela and AJ misunderstanding new promo viral

Navri Mile Hitlerla मालिकेत लीला व एजे यांच्यात होणार गैरसमज, नवीन प्रोमो व्हायरल

Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे व लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होताना दिसत आहे. अशातच आता मालिकेत नुकतेच लीला अभिरामच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. जहागीरदार कुटुंब परदेशात फिरायला गेले असताना त्यांच्यातील प्रेम अधिक बहरल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला होता. अशातच आता मालिकेत एक अनपेक्षित वळण आले आहे. (Navri Mile Hitlerla Serial Update)

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात लीला व एजे यांच्यात गैरसमज निर्माण होणार असल्याचे पाहायला मिळत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली आहे. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून त्याने यावेळी लीलाला असं म्हटलं की, “तु माझ्या आणि अंतराच्या मध्ये येणार असशील तर तुला या घरात जागा नाही. तुला मी शेवटचे सांगत आहे, तुला जर या घरात अंतराची जागा न घेता फक्त लीला म्हणून राहायचे असेल तरच राहा. नाहीतर इथून जा”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – शशांक केतकरने मालाडमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMC ने घेतली दखल, साफसफाई बघून म्हणाला, “सगळे मिळून…”

‘नवरी मिळे हिटलरला’च्या सोमवारच्या भागात लीलाने एजे व अंतरा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले होते. अंतराच्या फोटोपुढे लिहलेल्या पत्रामध्ये लीलाने अंतरासारखे वागावे असं लिहिलं होतं. मात्र हा सरस्वती, दुर्गा व किशोर यांचा प्लॅन होता. त्यांच्या प्लॅनमध्ये लीला फसते आणि ती एजेंना जे आवडत नाही तेच करुन बसते. त्यामुळे लीला अंतराची जागा घेत असल्याचा गैरसमज निर्माण होऊन एजे लीलावर चिडतात. या गैरसमजातून ते लीलाला या घरात न राहण्याचेही सांगतात. यामुळे लीला दुखावली जाते.

आणखी वाचा – ‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट

त्यामुळे एकीकडे लीला एजेंच्या प्रेमात पडत आहे तर दुसरीकडे एजे लीलाला दूर जायला सांगत आहेत. त्यामुळे आता लीलाला दुर्गा, सरस्वती यांच्या प्लॅनमध्ये फसणार की? यातून लीला स्वत: मार्ग लढत एजेंच्या मनात आपलं स्थान निर्माण करणार? हे आगामी भागातून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसादही दिला आहे.   

Tags: Marathi Serial NewsNavri Mile HitlerlaNavri Mile Hitlerla News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Abhishek Bachchan-Nimrat Kaur Affair Rumours

अभिषेक बच्चन सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात?, ऐश्वर्या रायसह घटस्फोटावरुन रंगल्या तुफान चर्चा, नक्की खरं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.