‘इंडियन आयडल’ फेम गायक अभिजीत सावंत नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये आपल्या वागण्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे पाहायला मिळाले. ‘बिग बॉस मराठी ५’ पर्वात तो टॉप २ पर्यंत पोहोचत उपविजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’चा शो जरी संपला असला तरी त्याची बिग बॉसच्या घराबाहेरदेखील चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. अभिजीत कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत राहत असतो. (Abhijeet Sawant Vlog Video)
अभिजीत हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर सर्वांनीच आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात केली आहे. पण अभिजीतने आपली एक वेगळी वाट निवडली आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे आणि याचे कारण म्हणजे त्याने नुकतंच सुरु केलेलं व्लॉगिंग.
आणखी वाचा – “मुलांची आठवण येते पण…”, घटस्फोटांच्या चर्चांवर फरदीन खानने सोडलं मौन, म्हणाला, “वाईट वाटतं…”
अभिजीतने इन्स्टाग्रामवर पत्नीबरोबरचा एक व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो “मित्रांनो आज आपण चाललो आहोत शॉपिंगला” असं म्हणत व्लॉगची सुरुवात करतो. पण नंतर त्याला ते जमत नसल्याचे लक्षात येताच तो पुढे असं म्हणतो की, “कसं करतात हे व्लॉग वगैरे… डोक्यात नक्की काय असतं? व्लॉगिंग करणे हे खूपच कठीण आहे”. पुढे त्याची बायको त्याला आतून साद देत असं म्हणते की, “मला एक कल्पना सुचलेली आहे”. यावर अभिजीतही प्रेक्षकांना असं सांगतो की, “बायको आयडिया देत आहे, बघूया काय आयडिया आहे?”
पुढे त्याची बायको आयडिया देत असं म्हणते की, “मी म्हणेन की खूप कंटाळा आला आहे, कुठे तरी जायला पाहिजे”. पुढे ती अभिजीतला असं म्हणते की, “मग तू बोल, शॉपिंग”. मग मी म्हणणार, “अरे हा… शॉपिंग…”. यानंतर शिल्पा व अभिजीत ठरल्याप्रमाणे व्हिडीओ बनवतात. शेवटी अभिजीत एकदम फालतू… फालतू…” असं म्हणत हसू लागतो. दरम्यान, अभिजीत व त्याच्या पत्नीच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटलं आहे.