Ankita Walavalkar Father Video : ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ हे पर्व संपलं असलं तरी यंदाच्या पर्वातील स्पर्धक हे विशेष चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या पर्वातील नेहमीच चर्चेत असणार पात्र म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. यंदा अंकिता स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाली आहे. कोकणी व मालवणी भाषेवरील प्रेम ती आशयघन कंटेन्ट मार्फत चाहत्यांच्या समोर मांडताना दिसते. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अगदी पाहिल्यादिवसापासून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अंकिताचा ‘बिग बॉस’मधील प्रवास टॉप ५ पर्यंत पाहायला मिळाला.
‘बिग बॉस’च्या घरात असताना फॅमिली वीकमध्ये अंकिताला खूप मोठं सरप्राइज मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला भेटायला तिचे बाबा येतात. अंकिताचे बाबा घरात येताच ती शॉक झाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती “बाबा” असं म्हणत मोठ्याने ओरडते आणि त्यांना मिठी मारताना दिसली. वडिलांना बघून अंकिताला अश्रू अनावर झाले. यावेळी अंकिताने बिग बॉसचे आभार मानले. “थँक्यू बिग बॉस तुम्ही माझ्या बाबांना पहिल्यांदा मुंबईत आणलं आहे”, असं तिने यावेळी म्हटलं.
अंकिताचे बाबा ‘बिग बॉस’निमित्त लेकीला भेटण्यासाठी पहिल्यांदा कोकणातून मुंबईत आले. कोकणातून मुंबईत आल्यावर मुंबई फिरतानाचा त्यांचा एक सुंदर असा व्हिडीओ अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. “बाबा मुंबईत आले तेव्हा तो क्षण पाहण्यासाठी मी त्यांच्याबरोबर नव्हते. पण एका दिवसांत जमेल तितकी मुंबई त्यांनी पहिली. खरंच हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही. ‘बिग बॉस’च्या घरात बाबा आले ही एक आश्चर्याची गोष्ट होती. पण बाहेर राहून मला वोट करणं आणि मला वोट मिळावेत यासाठी बाबा प्रयत्न करत होते ही सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट होती. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या मुली पहिल्या याव्या यासाठी बाबांनी कायम आमचा अभ्यास घेतला हे यानिमित्त आठवलं. हे मी कधीच विसरु शकत नाही. आणि हे सर्व तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झालं यासाठी मी खूप आभारी आहे”, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – नवरात्रोत्सवात बंगाली स्टाईलने सई लोकूरने धरला ठेका, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात पहिल्यांदा…”
सांगायचं झाल्यास अंकिताचे वडील कधीच मुंबईत आले नव्हते. अंकिताने तिच्या व्हिडीओमध्येही अनेकदा याविषयी भाष्य केलं. अंकिता शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत राहायला आली. त्यांनंतर तिनं युट्यूब क्षेत्रात नाव कमावलं. कोकणात तिच्या गावी तिने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यात तिला तिच्या कुटुंबियांची मोठी साथ मिळाली. अंकिता तिच्या बहिणी आणि आईबरोबर अनेकदा मुंबईत येते. पण तिचे वडील आजवर कधीच मुंबईत आले नव्हते. बिग बॉसच्या निमित्तानं अंकिताचे वडील पहिल्यांदा मुंबईत आलेत.