‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बाजी मारली असली तरी या चित्रपटाला घेऊन होणारे वाद काही संपलेले नाहीत. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ने आतापर्यंत भारतात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे, आणि अशातच या चित्रपटाच्या यशाला अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘धोकादायक ट्रेंड’ असं घोषित केलंय. नसिरुद्दीन यांनी केलेल्या या भाष्यावर प्रतिक्रिया देत भाजपचे नेते आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे, मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे की, “ते एक चांगले अभिनेते आहेत पण नसीरुद्दीन यांची नियत चांगली नाही. मनावर दगड ठेवून मला हे बोलावं लागतंय.”(Naseeruddin Shah Troll)
“जेव्हा एखाद्या चित्रपटात एखादा मुलगा दुकानात बसला असताना मुलीबद्दल कमेंट करतो. तेव्हा नसीर साहेबांना काहीच बोलायचं नसतं. द केरला स्टोरी आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट तथ्यांवर आधारित आहेत. जर त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी कोर्टात जावं. बोलणं खूप सोपं असतं. त्यांनी ज्या पद्धतीने स्वत:ची ओळख करून दिली आहे, ती भारतीय म्हणून आणि माणूस म्हणून चांगली नाही”, असंही मनोज तिवारी म्हणाले.
पहा का नसिरुद्दीन यांच्यावर साधला निशाणा (Naseeruddin Shah Troll)
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत वक्तव्य केलं होतं. “भीड, अफवाह, फराझ यांसारखे दमदार चित्रपट फ्लॉप ठरले. कोणीच ते चित्रपट बघायला गेलं नाही. पण द केरला स्टोरीसाठी लोक गर्दी करत आहेत. तो चित्रपट मी पाहिला नाही आणि पाहण्याची माझी इच्छाही नाही. कारण त्याबद्दल मी पुरेसं वाचलं आहे”, असं नसिरुद्दीन यांनी म्हटलं होत.(Naseeruddin Shah Troll)
यापुढे ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत बोलत असताना त्यांनी असंही म्हटलं आहे की, “एका बाजूला, हा धोकादायक ट्रेंड आहे, त्यात काही शंका नाही. आपण नाझी जर्मनीच्या वाटेवर जात आहोत असं दिसतंय. जिथे हिटलरच्या काळात चित्रपट निर्मात्यांना सहनियुक्त केलं गेलं, तसं करण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणून ते सर्वोच्च नेत्याची प्रशंसा करणारे चित्रपट बनवतील. (Naseeruddin Shah Troll)
हे देखील वाचा – गौतमी पाटीलच खरं नाव तुम्हाला माहित आहे का? थेट गौतमीच्या वडिलांनीच केला खुलासा
त्या सर्वोच्च नेत्याने देशवासियांसाठी काय केलं आणि ज्यू समुदायाचं कशा पद्धतीने खच्चीकरण केलं हे त्यात दाखवू शकतील. जर्मनीतील अनेक मास्टर फिल्ममेकर्स ते ठिकाण सोडून हॉलिवूडला आले आणि तिथे त्यांनी चित्रपट बनवले. इथेही तेच होताना दिसतंय. एकतर उजव्या बाजूला रहा, तटस्थ राहा किंवा प्रस्थापितांच्या बाजूने व्हा”, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
