गौतमी पाटील हे नाव गेली अनेक दिवस चर्चेत आहे. एक दिवस आड करून गौतमीची बातमी ही प्रत्येक वृत्तवाहिनी देतेय. गौतमीला अनेकांनी सपोर्ट केलाय तर काहींनी गौतमीवर बहिष्कार टाकलाय. इतकंच नव्हे तर राजकीय नेतेदेखील गौतमीला घेऊन भाष्य करताना दिसत आहेत. गौतमीचा डान्स हा काही लोकांना आवडतोय तर बरेचदा गौतमीचा डान्स हा वादाच्या भोवऱ्यात अडकतोय. (Gautami Patil Real Name)
मागील काही दिवसांपासून गौतमीच्या आडनावावरून, नावावरून चर्चा सुरु आहे. यावर आता थेट गौतमीच्या वडिलांनीच भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. गौतमीवर होणाऱ्या वादाला घेऊन गौतमीच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला मुखात दिली. यावेळी गौतमी पाटीलच्या वडिलांनी गौतमीच्या जन्मस्थानाबद्दल, नावाबद्दल आणि आडनावाबद्दल खुलासा केला आहे.
जाणून घ्या गौतमीच्या खऱ्या नावाचा किस्सा (Gautami Patil Real Name)
गौतमीचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी मुलीची बाजू घेत गौतमी विरुद्ध बोलणार्यांना थेट चोख प्रत्युत्तर केलं आहे. गौतमीवर सातत्याने होणारी टीका पाहता तिच्या वडिलांनी सांगितलं की, लोक बोलतच राहतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. त्यानंतर गौतमीच्या खऱ्या नावाबद्दल खुलासा केला आहे, गौतमीचं जन्म नाव वैष्णवी पाटील होतं, पण तिला शाळेत टाकताना नाव बदलून गौतमी ठेवलं होतं, असा दावा गौतमीचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी वृत्तवाहिनीला मुलखात देताना केला.(Gautami Patil Real Name)
गौतमीचे वडील हे त्यांच्या मूळगावी जळगाव येथे राहतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका लहानश्या गावात गौतमीच कुटूंब राहत आहे. तिथेच ते शेती करतात. गौतमीच्या वडिलांना त्यांच्या मुलीचा अभिमान आहे. गौतमी काहीच वाईट करत नाहीये, असं म्हणत त्यांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे.(Gautami Patil Real Name)
हे देखील वाचा – सिनेसृष्टीमध्ये प्रार्थनाला १४ वर्ष पूर्ण-रेशीमगाठ च्या टीमने दिलं सरप्राईज
पाटलांचा बैलगाडा या गाण्यावरील गौतमी पाटीलच्या नृत्याने सर्वांची बोलती बंद केली आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरी गौतमीचे लाखो चाहते दिवाने आहेत. गौतमी नृत्य करण्यासाठी विविध समारंभांना जात असते, आणि याचे अपडेट ती तिच्या सोशल मीडियावरून वेळोवेळी देत असते.
