Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचे आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. (Tula Shikvin Changlach Dhada Serial News)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुलता एकीकडे अधिपतीविषयी काळजी व प्रेम व्यक्त करत आहे. पण दुसरीकडे अधिपती तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नाही असं दिसून येत आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात अक्षरा अधिपतीने चारुलताला समजून घ्यावे असं म्हणते. यावर अधिपती तिला “मी जे नाते आठवत नाही, ते नाते तुम्ही माझ्यावर का लादत आहात” असं म्हणतो. यावर अधिपती त्याला असं म्हणते की, “तुम्हाला आठवत नसलं तरी ते नाते आहेच ना?”. यावर अधिपती चिडतो. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात चारुलता घर सोडून जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये चारुलता असं म्हणते की, “माझ्यामुळे या घरात भांडणे होत आहेत. माझा संसार असून नसल्यासारखा आहे. घरातल्या अस्थिरतसाठी मी कारणीबहुत नको ठरायला. आता मला हे पाऊल उचललंच पाहिजे”. यानंतर चारुलता हातात बॅग घेऊन घराच्या बाहेर निघणार असते. इतक्यात अक्षरा तिला अडवते आणि असं म्हणते की मी तुम्हाला वचन देते की तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुमचं आणि बाबांचं पुन्हा लग्न लावून देईल”. तर पुढे अधिपती आपल्या आईसाहेबांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी तो असं म्हणतो की, “भुवनेश्वरी सूर्यवंशी तुम्ही आम्हाला का बरं सोडून गेलात? हा निर्णय तुमचा सपशेल चुकला आहे. तुमच्या नजरेचा तो दरारा, तो धाक, ती माय आम्हाला परत पाहिजे. तुम्ही या. तुमची या घरातली जागा मी कोणालाच घेऊ देणार नाही”. दरम्यान, चारुलता सूर्यवंशीच्या घरात आल्यापासून सतत वाद होताना दिसत आहेत. जन्मदाती आई असलेल्या चारुलताला अधिपती अजूनही स्वीकारत नाहीये. तरी देखील चारुलता सातत्याने आपल्यापरीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. पण यामुळे सूर्यवंशीच्या घरात वाद होतं आहेत. म्हणूनच चारुलताने सूर्यवंशीचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.