रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगी झाली हो! खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 2, 2024 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Khushboo Tawde and Sangram Salvi become a second time parents blessed with a baby girl

मराठी अभिनेत्री खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना मुलगी झाली आहे

Khushboo Tawde Baby Girl : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवी ही जोडी. प्रेक्षकांची लाडकी जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच खुशबूने सोशल मीडियावरून जाहीर केली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मधून खुशबूने एक्झिट घेतली. यावेळीच खुशबू दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं होतं. तसंच खुशबूने तिच्या गरोदरपणाबद्दलचा एक व्हिडीओही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. “थोडंसं आणखीन प्रेम आमच्या कुटुंबात सामिल होतं आहे”, असं कॅप्शन देत खुशबूने नवरा संग्राम व मुलगा राघव यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता. (Khushboo Tawde and Sangram Salvi Baby Girl)

अखेर अभिनेत्री खुशबू तावडे आई झाली आहे. नुकतेच ते दोघे दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. २ नोव्हेंबर २०२१ रोजी खुशबूने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव राघव आहे. अशातच अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाल्याचे समजते आहे. सहअभिनेत्री वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खुशबूला मुलगी झाली असल्याचे म्हटलं आहे. अभिनेत्रीने दोघींचा फोटो शेअर करत ‘its a girl’ असं म्हणत अभिनंदन केलं आहे

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आपल्या नावांचा वापर केला आणि…” ; इतरांच्या विरोधात जाऊन अभिजीत-निक्कीमध्ये एकी, म्हणाली, “सगळे विरोधात…”

खुशबूने ऑगस्ट महिन्यात तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यावेळी ती झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करत होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करत मालिकेतूनही निरोप घेतला होता. जवळपास सातव्या महिन्यांपर्यंत तिने मालिकेत काम केले होते. तिने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी पल्लवी वैद्य पाहायला मिळाली होती.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मधील निक्की-आर्या यांच्या ‘त्या’ वादावर संग्राम चौगुलेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “निक्कीने मारायचा प्रयत्न केला आणि…”

दरम्यान, अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २०१८ साली लग्न केले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव असून लवकरच खुशबूच्या घरी आता एका चिमुकलीचेदेखील आगमन झाले आहे. यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  

Tags: Khushboo Tawde and Sangram Salvi baby girlKhushboo Tawde Marathi NewsKhushboo Tawde Mother News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Bollywood actor Aamir Khan ex wife Reena Dutta father passed away see the details

आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या वडिलांचे निधन, कठीण काळात अभिनेत्याची कुटुंबियांना साथ, आईसह घेतली भेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.