आपल्या मुलांच्या यशा इतकं मोठं सुख आई वडिलांसाठी दुसरं कोणतंच नसेल. आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आई वडील करत असतात. मुलं सामान्य माणसांची असो व कोण्या मोठ्या सेलेब्रिटीजची मुलांप्रती सगळ्या पालकांचं कर्तव्य सारखंच.(Madhuri Dixit Son)
असाच एक आनंदाचा क्षण आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासाठी. माधुरी दीक्षित यांचा मुलगा रयाण ने त्याच गॅज्युवेशन पूर्ण केलं आहे. त्याला शुभेच्छा देत माधुरीने तिच्या अकाउंट वरून काही फोटोज आणि व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

पालक म्हणून आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. असं कॅप्शन देत माधुरी आणि श्रीराम यांनी रयाणला शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीचा अभिनय, नृत्यकौशल्य याने तिने प्रेक्षकांचं मन चांगलंच जिंकलं. त्यामुळे माधुरी दीक्षित यांचं नाव निघालं की, हम आपके है कौन या चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. (Madhuri Dixit Son)
हम आपके है कौन या चित्रपटाची बातच वेगळी आहे, एव्हरग्रीन चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट महत्वाचं स्थान बजावतो.इतक्या वर्षानंतर ही तितक्याच आवडीने आणि आपुलकीने प्रेक्षक हा चित्रपट पाहतात.सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या केमिस्ट्रीच प्रेक्षक आजही कौतुक करतात.