Bigg Boss 18 : टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस हिंदी’ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून सगळ्यांचं लक्ष ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाकडे आहे. यादरम्यान सलमान खान हे पर्व होस्ट करणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी सलमान खान ‘बिग बॉसच्या १८’व्या पर्वाचं चित्रीकरण करताना पाहायला मिळाला. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना दिलासा मिळाला. अशातच आता ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे. ईशा कोप्पीकर आणि धीरज धूपर ‘बिग बॉस १८’मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र या दोघांच्या नावाची चर्चा होऊनही त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.(Bigg Boss 18 Contestant List)
अशातच ‘बिग बॉस १८’मध्ये आणखी काही कलाकार आहेत, ज्यांची नावं आता ‘बिग बॉस’ने निश्चित केली आहेत. यात निया शर्मा, शोएब इब्राहिम, न्यारा बॅनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थले, सॅली साळुंखे, शांती प्रिया, अविनाश मिश्रा, देब चंद्रिमा सिंघा रॉय आणि चाहत पांडे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहजादा धामी, जान खान, करण वीर मेहरा, ऋत्विक धनजानी, करम राजपाल, पद्मिनी कोल्हापुरे आदी कलाकारांच्या नावांचीदेखील चर्चा होत आहे.
‘बिग बॉस १८’व्या पर्वाचा दमदार प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सलमान खान यंदाच्या पर्वात काय विशेष असणार हे सांगताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पर्वात सदस्यांचं भविष्य ‘बिग बॉस’ पाहणार आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस हिंदी’मध्ये काय थीम असणार आहे? हे स्पष्ट झालं आहे. टाइम का तांडव हे ‘बिग बॉस१८’व्या पर्वाचं थीम असणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या आधारे घरातील स्पर्धकांना विभागले जाणार आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “जाताना तो किडे करुन गेला”, अंकिताचे अरबाजबद्दल भाष्य, कोकण हार्टेड गर्ल असं का म्हणाली?
दरम्यान, सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो या सीझनचा होस्ट नसल्याची बातमी मध्यंतरी आली होती. पण आता त्याने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. रात्री ९ वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर हा बहुचर्चित ‘बिग बॉस’ पाहता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.