रंगभूमीचा चंदेरी रंगमंच असो वा चित्रपटाचा सोनेरी पडदा असो… आपल्या बहारदार व चिरतरुण अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनयातले अशोक सम्राट तसंच राज्याचा मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांनी आजवर मराठी नाटक, मालिका, चित्रपट त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाने सर्वांवर चकित केले आहे. नाटकात किंवा चित्रपटात त्यांना पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. नुकताच त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाबरोबर त्यांनी चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे, तो म्हणजे लाडके अशोक मामा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. (Ashok Saraf New Serial)
कलर्स मराठी वाहिनीवरील एका आगामी मालिकेतून अशोक मामा आता सर्वांचे मनोरंजन करणार आहेत. कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार अभिनय सम्राट अशोक सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचे नावही फार रंजक आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या या मालिकेचे नाव ‘अशोक मा.मा’ असे आहे. पहिल्या-वहिल्या प्रोमोमध्ये लाडक्या अशोक मामांचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! अरबाज पटेल Bigg Boss Marathi च्या घराबाहेर, निक्कीचे रडून रडून हाल, असं का घडलं?
या नव्या प्रोमोनुसार मालिकेत काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा यात दिसत आहेत. ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हा त्यांच्या या पात्राच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. पण मालिकेचा नेमका बाज काय आहे ते दिसून येत नाहीये. पण या मालिकेतून काहीतरी खास पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – 23 September Horoscope : ‘या’ राशींना सोमवारी मिळणार आनंदावार्ता, नोकरी-व्यवसायासाठी दिवस आहे फारच खास
दरम्यान, ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक सराफ यांच्यासह आणखी कोणते कलाकार या मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.