बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 च्या घरामधून निक्की पडली बाहेर?, अरबाजला मिठी मारत ढसाढसा रडू लागली अन्…; प्रोमो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 22, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo

Bigg Boss Marathi 5 च्या प्रेक्षकांच्या मतांनुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोनमध्ये, नक्की कोण जाणार घराबाहेर

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Bigg Boss Marathi 5 new promo)

या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांवरुन वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात वर्षा या घराबहेर जाणार नसल्याचे दिसत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – The Family Man 3 मध्ये ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?

या नवीन प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना बिग बॉस बोलवतात आणि त्यांच्यापुढे ठेवलेल्या सुटकेसमध्ये त्यांच्या निकालाचे लिहलेले एक कार्ड ठेवलेल असते. यात सूरज, जान्हवी व वर्षा यांच्या सुटकेस मध्ये ‘सेफ’ (सुरक्षित) असलेले कार्ड असतं. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईमध्ये झाला होता मोठा अपघात, आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अशी झाली आहे अवस्था

या प्रोमोमधून बिग बॉस असं म्हणतात की, “प्रेक्षकांच्या मतांनुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात”. यापुढे बिग बॉस “या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे…” अस म्हणतात आणि निक्की अरबाजला मिठी मारुन रडू लागते. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.   

Tags: Arbaz PatelBigg Boss Marathi 5 New Promonikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sshura Khan Baby Bump
Entertainment

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

जून 4, 2025 | 1:14 pm
avantika malik on divorce with imran khan
Entertainment

“मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जून 4, 2025 | 12:56 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

जून 4, 2025 | 12:34 pm
Gurmeet Choudhary On Robbery
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

जून 4, 2025 | 11:51 am
Next Post
Bollywood actress Vijayata Pandit sought help from Shah Rukh Khan and Amitabh Bachchan after the death of her late husband Aadesh Srivastava.

“शाहरुख व अमिताभ यांनी आश्वासन दिलेलं पण...”, पतीच्या निधनानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री मागतेय मदत, म्हणाल्या, “कुटुंब समजून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.