सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाने कायमच चर्चेत राहत असते. मात्र अभिनेत्री तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांती व तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. क्रांतीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असते. आपल्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत असते. (Kranti Redkar Video)
क्रांती आपल्या अनोख्या शैलीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीबद्दलचे तसंच तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतं असतात. अशातच नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून तिने लेकींच्या हिंदी भाषा शिकतानाच्या गंमतीजमती सांगितल्या आहेत. क्रांतीच्या लेकी सध्या हिंदी भाषा बोलायला शिकत असून हिंदी भाषा बोलताना काही शब्दांमध्ये त्यांच्या चुका होत आहेत आणि या चुकीच्या शब्दांचा मजेशीर व्हिडीओ क्रांतीने शेअर केला आहे.
आणखी वाचा – पॉर्नस्टार असूनही किसिंग सीन करताना सनी लिओनी घाबरली अन्…; महेश भट्ट यांचा खुलासा, म्हणाले, “तिचं लाजणं…”
क्रांतीने या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “छबिल आणि गोदोला हिंदी येत नाही. म्हणजे त्यांना आता शाळेत ते शिकवायला लागलेत. एरव्ही मातृभाषा मराठी आणि इंग्रजी मध्ये ते बोलतात. पण हिंदीची जरा गडबडच आहे. तर त्यांना शाळेत हिंदी शिकवत असल्यामुळे त्या दोघी त्यांच्या त्यांच्यात हिंदी बोलण्याचा सराव करत आहेत. त्यामुळे त्या एकमेकींशी आणि आमच्याशी हिंदी भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे खूपच मजेशीर आहे. तर मी त्यादिवशी जेवण वाढत होते तर छबिल मला म्हणते की, “मम्मी तू हमके खाना दुंगी”. यावर मी तिला म्हटलं की, “हो बाळा, मी तुला जेवायला देणार”.
यापुढे क्रांतीने असं म्हटलं आहे की, “यावर गोदो तिला असं म्हणते की, “तू हमके खाना दुंगी तर हम खाना घुंगी. म्हणजे मी घेणार. यावर छबिल पुन्हा तिला असं म्हणते की, “अगं तू हमके खाना दुंगी तर हम खाना घुंगी नाही हम खाना खुंगी. खुंगी म्हणजे खाणार. त्यामुळे हिंदीच्या नावाखाली घुंगी, घुंगी आणि खुंगी हे सगळं चालू आहे. त्यामुळे सर्व हिंदी भाषिकांची मी आधीच माफी मागत आहे. पण आम्ही शिकतोय. हम सिख रहे हिंदी और हम जल्द ही अच्छी हिंदी बोलेंगे. हमे आशा है”. दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. कीर्ती कुल्हारी, अश्विनी भावे व संदीप पाठक यांसारख्या अनेक कलाकारांनीदेखील या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.