Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आतापर्यंत सात आठवडे पूर्ण झाले आहेत. गेल्या आठडव्यात ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड एन्ट्री झाली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री झाली आहे. गेल्या सहा आठवड्यापासून घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून संग्राम चौगुलेने घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतली. कोल्हापुरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर संग्राम चौगुले यांची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्रामच्या एन्ट्रीनंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
वाइल्ड कार्ड एन्ट्री येण्याची कल्पना ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना देताच स्पर्धक अनेक तर्क-वितर्क लावताना दिसत दिसले होते. यावेळी सूरजने घरात वाइल्ड कार्ड म्हणून कुणीतरी मुलगी यायला हवी होती असं म्हटलं होतं. अशातच आता याबद्दल ‘बिग बॉस’ सूरजची मस्करी करतानाचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात ‘बिग बॉस’ सूरजच्या मैत्रीणीचा विषय काढताच सूरज लाजला असल्याचे पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये बिग बॉस सूरजला असं म्हणतात की, “सूरज मी असं ऐकलं आहे की तुम्हाला एक मैत्रीण हवी आहे? तर तुम्हाला नक्की कशी मैत्रीण हवी आहे?”. यावर सूरज लाजत असं म्हणतो की, “चांगला स्वभाव असणारी आणि साडी घालणारी मुलगी पाहिजे”. यावर अभिजीत, अंकिता व घरातील इतर सदस्य त्याची मस्करी करतात. यावेळी निक्कीही “पोरगा लाजला” असं म्हणते. तर अभिजीत त्याला “तुला मैत्रीणीबद्दल विचारत आहेत तू लग्नाचं प्रपोजल का देत आहेस” असं म्हणतो.
दरम्यान, या प्रोमोला नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची इच्छा व्यक्त करत राखी सावंत वाइल्ड कार्ड स्पर्धक नहणून यावी असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी आर्या पुन्हा येणार का? असा प्रश्नदेखील विचारला आहे. त्यामुळे आता या नवीन प्रोमोमधून घरात वाईल्ड कार्ड म्हणून कुणी मुलगी येणार काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.