बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने त्याची पहिली पत्नी मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर शुरा बरोबर लग्न केले. यामुळे तो खूप चर्चेत आला होता. दोघांचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता त्यांचा लहान भाऊ सोहेल खानदेखील चर्चेत आला आहे. सोहेलने सीमाबरोबर १९९८ साली लग्नबंधनात अडकला. २४ वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. अशातच आता सोहेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (sohail khan with mystry girl)
घटस्फोटानंतर सोहेलच्या आयुष्यात त्याच्या पार्टनरची एंट्री झाल्याचे समोर येत आहे. एका मुलीबरोबर तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये असणारी मुलगी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. ९ सप्टेंबर २०२४ साली सोहेलला मुंबई येथील एका आलीशान हॉटेलमध्ये एका मुलीबरोबर पाहिले गेले. यावेळी त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट व ब्राऊन रंगाची जोगर्स घातली होती. हॉटेलमधून बाहेर पडताना त्याने फोटोग्राफर्सना पोजदेखील दिल्या. त्यानंतर तो कारमध्ये बसून निघून गेला.
मात्र या सगळ्यामध्ये एका गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या कारने तो गेला त्यामध्ये मागच्या सीटवर अजून एक मुलगी दिसून आली. त्यामुळे आता या ती नक्की कोण? यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. या दोघांनाही कॅमेरामध्ये कॅप्चर केले गेले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्याचप्रमाणे ५५ वर्षांच्या सोहेलबरोबर मुलगी कोण असावी? असा अंदाजदेखील नेटकरी लावताना दिसत आहेत. त्याच्या आयुष्यात नवीन प्रेम आलं असा अंदाजदेखील लावत आहेत. मात्र सोहेलने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान सोहेलचा पहिला विवाह हिंदू व मुस्लिम पद्धतीने पार पडला होता. त्यांना निर्वाण व योहान अशी दोन मुलं आहेत.