सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पिकनिकमध्ये संतोषने एकट्यानेच केलं काम, त्याची अवस्था पाहून कुशलला हसू आवरेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “सगळ्यांची काळजी…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 4, 2024 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi comedy actor Kushal Badrike shared picnic video of his friend Santosh Juvekar, Abhijeet Chavan and Viju Mane

कुशल बद्रिकेने शेअर केला संतोष जुवेकरचा मजेशीर व्हिडीओ, सर्व काम एकट्यालाच करायला लावलं अन्…

मनोरंजनविश्वात कलाकार मंडळी एकमेकांसोबत काम करत असतानाच एकमेकांचे जिगरी दोस्तही होऊन जातात. दिवसातला बराचसा वेळ सेटवर एकत्र घालवल्यामुळे त्यांच्यात झालेली मैत्री घट्ट असते. मराठी सिनेविश्वातलं असाच एक मैत्रीचा ग्रुप म्हणजे म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता कुशल बद्रिके अभिनेता अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने. हे चौघे मित्र त्यांच्या ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्यातील मैत्री प्रत्येकाला आपलीशी वाटते. हे चौघे मित्र सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्यातले धमाल, मजामस्तीचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच कुशलने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओतून कुशल, विजू, अभिजीत व संतोष यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. (Kushal Badrike Shared Picnic Video)

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिले जाते. तो कायम विविध कारणांनी चर्चेत असतो. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असतात. अशातच त्याने शेअर केलेला नवीन व्हिडीओ चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये हे चौघे मित्र कोणत्या तरी फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले असून यात सर्व जण एन्जॉय करत आहेत. मात्र संतोष जुवेकर एकटा सर्व काम करत आहे. कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संतोष सर्व सामान आणताना पाहायला मिळत आहे. तर कुशल त्याचा व्हिडीओ काढत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – 04 September Horoscope : मेष व मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस आर्थिक लाभाचा, नोकरी व व्यवसायात होणार नफा

संतोष, विजू व अभिजीत यांचा हा व्हिडीओ शेअर करत कुशलने असं म्हटलं आहे की, “पिकनिकमध्ये एक मित्र तरी असा असतोच जो कायम सगळ्यांची काळजी घेतो ठिकाण शोधण्यापासून सगळ्यांच्या सामानाची जबाबदारीसुद्धा त्याच्यावरच येते. आमच्यात ती भूमिका पार पाडणारा संतोष आहे आणि तीच भूमिका “पारऽऽऽ पाडणारा” बाबा (अभिजीत चव्हाण) आहे”. कुशलने संतोषसाठी हा खास व्हिडीओ केला असून तो एकटाच या व्हिडीओमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. अभिजीत एकीकडे फोनवर बोलण्यात मग्न आहे तर विजू माने टीव्ही बघण्यात आणि कुशल या सर्वांचे व्हिडीओ बनवण्यात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : BB फार्ममधून दूध मिळवण्यासाठी स्पर्धक पुन्हा एकमेकांना भिडले, कुणी धक्काबुक्की केली तर कुणी अरेरावी, नवीन प्रोमो व्हायरल

दरम्यान, कुशल, संतोष, विजू व अभिजीत हे मित्र पावसाळी पिकनिकनिमित्त फार्महाऊसवर गेले असून त्यांच्यातील खास मजामस्ती कुशलने या व्हिडीओमधून दाखवली आहे. त्यांच्या या खास क्षणांना अनेक चाहत्यांनी रिलेट केलं आहे. ,या व्हिडीओखाली अनेकांनी हसण्याच्या इमोजीद्वारे कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.    

Tags: Abhijeet Chavankushal badrikesantosh juvekarviju mane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Rehana Sultan Hospitalized

आयसीयुमध्ये आहे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, आर्थिक संकटामुळे खर्चही परवडेना, कलाकारांकडून मदतीचा हात अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.