अनेक विषयांवर आधारित मालिका आपल्याला रोज पाहायला मिळतात. घरातील महत्वाचं मानलं जाणार स्थान म्हणजे आई आणि आईच्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणारी अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते.
मालिकेच्या आधीच्या भागात आपण पाहिलं कि अनिरुद्धच्या आयुष्यात आलेली नवीन स्त्री ही दुसरी तिसरी कुणी नसून आशुतोषची बहीण वीणाच आहे.(Aai kuthe kay karte 18may)
यशाच्या साखरपुड्या दरम्यान अनिरुद्ध वीणा आणि आशुतोष मध्ये थोडीशी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. तेव्हा आशुतोष ने सर्वांसमोर अनिरुद्ध आणि वीणा एकत्र काम करत आहेत त्यात मला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं सांगितलं मात्र मालिकेच्या आजच्या भागात आशुतोष अरुंधती सांगतो कि माझी बहीण खूप वर्षांनी परत आलीये आणि मला अनिरुद्ध सारखा माणूस माझ्या बहिणीच्या जवळ गेलेला नको आहे.

अनिरुद्ध कामाच्या बाबतीत परफेक्ट असेल पण त्याच्या हेतू बद्दल मला शंका आहे. असं देखील आशुतोष अरुंधतीला म्हणताना पाहायला मिळतो.
तर आता आशुतोष, अरुंधतीच्या काळजीने वीणा आणि अनिरुद्धच्या नवीन बिझनेस वर काही परिणाम होणार का? त्यावर अनिरुद्धची काय रिअक्शन असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Aai kuthe kay karte 18may)
आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. मालिकेत अनेक रंजक वळणामुळे मालिका चर्चेत असते.या मालिकेचा सध्या मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो.