शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navra Majha Navsacha मध्ये प्रशांत दामलेंचीही होती प्रमुख भूमिका पण…; नेमकं घडलं काय?, जयवंत वाडकारांनी सांगितला भन्नाट किस्सा

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 2, 2024 | 9:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaywant Wadkar told that actor Prashant Damle was also part of Navra Majha Navsacha movie know the reason

Navra Majha Navsacha मध्ये प्रशांत दामलेदेखील होते पण, नेमका किस्सा काय?, जाणून घ्या...

सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी चित्रपटांपैकी एक एव्हरग्रीन चित्रपट महून आजही लोकप्रिय आहे. २००४ साली आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. चित्रपटाची कथा, गाणी तसेच कलाकारांच्या भूमिका अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. २००४ साली प्रदर्शित झाला आणि आज इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ तितकीच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये एसटीतून झालेला मुंबई ते गणपतीपुळे हा भन्नाट प्रवास प्रेक्षकांनी पाहिला होता. (Prashant Damle was part of Navra Majha Navsacha)

या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लीव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन, निम्रिती सावंत अशा अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. या कलाकारांबरोबरच अभिनेते जयवंत वाडकर यांनीदेखील ‘नवरा माझा नवसाचा’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. जागे असतानाच घोरणाऱ्या व्यक्तीच्या पात्राने चित्रपटात धम्माल उडवून दिली होती. या कलाकारांमध्ये आणखी एका प्रसिद्ध कलाकाराचाही समावेश होता आणि हा कलाकार म्हणजे प्रशांत दामले. हो! हे खरं आहे की ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये प्रशांत दामलेही असणार होते.

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

आणखी वाचा – ‘त्या’ भूमिकेनंतर लोकांनी वेडं ठरवलं तेव्हा…; ‘बाबा लगीन’ फेम अभिनेत्याने सांगितली संघर्ष कहाणी, म्हणाला, “रस्त्यावर लोक…”

‘नवरा माझा नवसाचा’मध्ये दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र काही कारणास्तव ते या चित्रपटात दिसले नाहीत. याबद्दल जयवंत वाडकरांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’मध्ये एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. याबद्दल बोलताना जयवंत वडकरांनी असं म्हटलं की, “नवरा माझा नवसाचा चित्रपटाच्या आधी आम्ही यशवंत नाट्य मंदिर येथे वाचन करायला बसलो होतो. संतोष पवार चित्रपटाची स्क्रिप्ट (संहिता) वाचत होता. तेव्हा वाचन करण्याआधी घडयाळ लावलं आणि काही वेळाने मी आणि विजय पाटकर आम्ही एकमेकांकडे बघितलं. तेव्हा सव्वा तीन तास फक्त वाचान सुरु होतं. याबद्दल आम्ही सचिनला सांगितलं. नुसतं वाचनच सव्वा तीन तास झालं होतं. त्यावर चित्रपट बनणार होता. त्यामुळे तिथेच प्रशांत दामले होते पण त्यांची भूमिका कट करण्यात आली”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तिला काहीच बोललं गेलं नाही”, भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची बाजू घेताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “फक्त ‘टीम बी’ला धारेवर…”

यापुढे जयवंत वाडकर असं म्हणाले की, “नवरा माझा नवसाचा चित्रपटात प्रशांत दामलेचीही एक भूमिका होती. तो येतो, हसवतो आणि अंताक्षरी खेळतो असं होतं. पण ते कट केलं आणि त्यामुळे ‘नवरा माझा नावसाचा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रशांत दामले नाही”. दरम्यान,  ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.         



Tags: jaywant wadkarNavra Majha Navsachaprashant damle
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Kokan Hearted Girl aka Ankita Prabhu Walawalkar Exit from the house Dhananjay Powar and Suraj Chavan emotional

Bigg Boss Marathi मधून 'कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकरची एक्झिट, धनंजय व सूरजला अश्रु अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.