शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “घन:श्यामबरोबर केलं तेच जर…”, ‘त्या’ कृतीबद्दल रितेशने अंकिता वालावलकरला चांगलंच झापलं, म्हणाला, “फार चुकीचं…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 1, 2024 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Riteish Deshmukh shouts to Ankita Walawalkar for pulling Ghanshyam Darawade in the task

Bigg Boss Marathi 5 च्या घरात अंकिताने घन:श्यामबद्दल केलेल्या कृत्याचा रितेशकडून समाचार, हे फार चुकीचं म्हणत दिला दम

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीपासूनच दोन गट तयार झाले. या दोन्ही गटातील स्पर्धकांचे वादविवाद, मैत्री, राडा पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात बीबी करन्सी आणि कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. यावेळी घनःश्याम सोन्याची नाणी गोळा करायला पाताळ लोकात शिरला असून त्याचा तोल जातो आणि तो गुहेत पडतो. वर्षाताईंकडे असलेल्या सोन्यांच्या नाण्याचा बॉक्स तो उडवून लावतो. वर्षाताई तो बॉक्स उचलायला जातात तर घनःश्याम त्यांना अडवतो. पुढे अंकिता घनःश्यामला एक टपली देते आणि तो खाली पडतो. सगळे सदस्य हसायला लागतात. अंकिता घनःश्यामचा पाय धरून त्याला ओढते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

यामुळे अंकिताची जोडी जिंकते. तसंच घरातील सदस्य अंकिताचे कौतुक करतात. मात्र शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये अंकिताच्या या कृतीबद्दल तिला रितेश देशमुखमे झापलं आहे. अंकिताने घन:श्यामबरोबर केलेली वागणूक चूकीची असतल्याचे म्हणत रितेशने अंकिताला चांगलंच झापलं. यावेळी रितेश अंकिताला असं म्हणाला की, “मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे, तुम्हाला घन:श्यामबद्दल आधीपासूनचं राग आहे. तुम्ही त्यांना कानाखाली मारावसं वाटतंय असंही म्हणाला होतात. पण तेव्हा मी हकल्यात घेतलं होतं. पण तुम्ही त्यांना पाडलं आणि जमिनीवर पडून खेचलंदेखील. तसंच त्यांच्यावर अरेरावीही केली. हा कोणता राग आहे.”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील सर्व सदस्यांना बसणार शॉक, पण नेमकं झालं तरी काय? पहा हा खास प्रोमो

यापुढे रितेश असं म्हणाला की, “तुमच्या रागामुळे ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला. तरीही तुमचे मित्र तुम्हाला काही बोलले नाहीत. ते उलट घन:श्यामलाच बोलत होते. या दूटप्पीपणा नाही का? आणि तुम्ही जे घन:श्यामबरोबर केलं तेच जर एका पुरुषाने तुमच्याबरोबर केलं तर तुम्हाला कसं वाटेल. अंकिता तुम्ही जे केलं ते फार चुकीचं होतं. इतकं होऊनही घरातील एकही सदस्य तिला काहीच बोलला नाही. कारण तुमचा एक ग्रुप आहे”.

आणखी वाचा – ‘या’ गंभीर दुखापतीमुळे ‘ठरलं तर मग’च्या सायलीवर झाली होती मोठी शस्त्रक्रिया, स्वत:चं खुलासा करत म्हणाली, “एका छोट्याशा अपघातामध्ये…”

दरम्यान, अंकिताचा गेम दिसून यावा म्हणून धनंजयने घन:श्यामला तसं करण्यास सांगितलं असल्याचे देखीक रितेशने यावेळी सर्वांसमोर आणले आणि यावरून त्याने धनंजयलादेखील सुनावले. “दुसऱ्याचा खेळ दिसून यावा म्हणून तुम्ही वाईट होऊ नका कारण ‘बिग बॉस हा ग्रुपचा खेळ नसून स्वत:चा वैयक्तिक खेळ आहे” असं रितेशने सर्वांना सांगितलं. तसंच वैभवच्या मागच्या खेळाची तुलना करत रितेशने धनंजयलादेखील गद्दारची उपमा दिली.    

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka Marathi actresses Kranti Redkar and Sayali Sanjeev watching show in the hotel video viral

बाईऽऽऽ हा काय प्रकार? सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीही ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेमात, जेवण सोडून शो पाहत बसल्या अन्...; व्हिडीओ व्हायरल  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.