Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मंगळवारी निक्की व अरबाजमध्ये जोरदार भांडणं झाली होती. अरबाजला निक्की व अभिजीतमधील मैत्री आवडत नसल्यानं घरात खटके उडाले होते. वादावादी आणि संतापामध्ये अरबाजनं घरातील वस्तूंची आदळ-आपट केली होती. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तणावाचे झाले होते. हेच तणावाचे वाटवारण बुधवारच्या भागातही पाहायला मिळाले. यावरुन घरात ड्रामादेखील झाला. निक्कीचे टोमणे ऐकून अरबाज ओक्साबोक्शी रडू लागतो आणि म्हणतो की, निक्की त्याच्या अशा गोष्टीचा फायदा घेते आहे. वैभव निक्कीला अरबाजच्या वाटेला जाऊ नको सांगतो, आणि जान्हवीही तिला धमकावते की त्याच्या जवळ जाऊ नको. (Bigg Boss Marathi 5 Daily update)
बुधवारच्या भागात अरबाज निक्कीला हात जोडून म्हणतो की, “तुला टोमणे मारायचे आहेत ते इतरांना मार, माझ्याशी बोलायला येऊ नको. मी खूप मेहनत करुन इथे पोहोचलो आहे, ते मला माझ्या रागामुळे गमवायचे नाही आहे”. यावर निक्कीही अभिजीतसमोर रडते. तिचे म्हणणे असते की, तिला अरबाजला जवळ घ्यायचे आहे, पण घरातले तसं वागू देत नाहीयेत. यानंतर वैभव जेव्हा निक्कीशी बोलायला येतो तेव्हा ती त्याला “चल, चल…” करुन पळवून लावते. अभिजीतलाही त्याच्याशी बोलू देत नाही. त्यानंतर निक्की वैभव-जान्हवीला अरबाजचे “चेलेचपाटे’ बोलत टोमणे मारते. त्यावरुन वैभवही तिला ‘नासके’, ‘नकली’ असं म्हणतो. एकूणच घरात अरबाज व निक्की यांच्यात फुट पडली आहे.
त्यानंतर आजच्या भागात निक्की व अरबाज एकमेकांशी समजुतीने बोलून त्यांचं नातं संपवणार आहेत. ‘बिग बॉस’च्या आजच्या भागात निक्की अरबाजजवळ जात आपलं नातं एका चांगल्या नोटवर संपवू असं म्हणते. यापुढे ती असं म्हणते की, “मी तुझ्याकडे किती वेळा बोलायला आली. पण काही लोकांना आवडत नाही म्हणून मी येत नाही. आपल्यातलं नातं असंच राहिलं तर पुढे जाऊन आणखी समस्या येतील. त्यामुळे चांगल्या अटीवर आपण आपलं नातं संपवूया. आपल्या या घरात खूप दिवस राहायचं आहे. त्यामुळे एकमेकांबरोबर नको खेळुयात. पण घरात हसत-खेळत राहू”.
यावर अरबाज असं म्हणतो की, “तू जेव्हा पण माझ्यापुढे येतेस तेव्हा गेल्या महिनाभरात आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येते. यामुळे मला खूप त्रास होत आहे.” यापुढे निक्की त्याला असं म्हणते की, “तुला तुझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ येत होती तेव्हा सर्वांनी मला तुझ्यापासून लांब केलं. त्यामुळे माझ्या मनात असा विचार आला की जर सगळेच मला तुझ्यापासून लांब करत आहेत आणि आपल्या खासगी गोष्टी तू सर्वांसमोर सांगत आहेस तर माझ्या मनात हा विचार आला की, मला तुझ्यापासून अंतर ठेवायचे आहे. इतकंचं”…