कलाकार कितीही फेमस झाले तरी मनोरंजन करण्यास ते कधीही मागे हटत नाहीत. आपल्या उत्तम अभिनयशैलीने ते नेहमीच चाहत्यांच मनोरंजन करण्यास तत्पर असतात. अशातच अभिनेता अंकुश चौधरी बद्दल बोलावं तेवढं कमीच. उत्तम अभिनयाने आजवर त्याने प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका चुकवला आहे. अंकुश चौधरी याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.(Ankush Chaudhari New Movie)
शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. विशेषतः या चित्रपटातील अंकुश चौधरी याने साकारलेली शाहीर साबळे यांची भूमिका अधिक भावली. हुबेहूब, तंतोतंत अभिनय करण्यात अंकुशचा हात कुणीही पकडू शकत नाही.
पाहा अंकुश सोबत झळकणार ही अभिनेत्री (Ankush Chaudhari New Movie)
आता या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अंकुश नव्याने मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. महादेव या त्याच्या आगामी चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या वर्कशॉपचा श्रीगणेशा झालेला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी सोबत छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री विदुला चौगुले झळकणार आहे.(Ankush Chaudhari New Movie)
हे देखील वाचा – ‘राजकारणाचा नुसता खेळ बनवलाय’ म्हणत ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा टिझर घालतोय धुमाकूळ
महादेव या चित्रपटात अंकुश महादेवाच्या भूमिकेत दिसणार का हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. अंकुशने या आधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. उत्तम अभिनेता म्हणून तो प्रेक्षकांचा लाडका आहेच. तर दगडी चाळ या सिनेमापासून अंकुशची तरुणाईलाही भुरळ पडलेली पाहायला मिळतेय. सध्या अंकुश मी होणार सुपरस्टार, जल्लोष जुनिअर्सचा या कार्यक्रमच जज म्हणून कार्यरत आहे. अंकुशल नव्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत.
