रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी’ची बाजी, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, अनुराधा पौडवाल यांचा गौरव

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 12:49 pm
in Trending
Reading Time: 6 mins read
google-news
Maharashtra State Marathi Film Award to actor Shivaji Satam and actress Rohini Hattangadi see the full list

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार शिवाजी साटम व रोहिणी हट्टंगडी यांना पुरस्कार, गोदावरी चित्रपटनेही पटकावले अनेक पुरस्कार

Maharashtra State Marathi Film Award : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात. अशातच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ‘दिवंगत राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’ने ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांना गौरवण्यात आलं. त्यांना २०२३ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबर ‘व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान करण्यात आला. (Maharashtra State Marathi Film Awards)

या पुरस्कारांसोबतच इथं अन्य पुरस्कारदेखील देण्यात आले. यामध्ये २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गौरवण्यात आलं. सोबतच २०२४चा चित्रपटांसाठीचा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीनं कंठ संगीतातील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांना गौरवण्यात आलं. दिवंगत राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक एन चंद्रा यांना गौरवण्यात आलं. तर, चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान या पुरस्कारानं लेखक, अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना गौरवण्यात आलं.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

तसेच यावेळी ५८ वे राज्य चित्रपट पुरस्कार यांचे वितरणही करण्यात आले ते पुरस्कार खालीलप्रमाणे :

सर्वोत्कृष्ट कथा : शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची)

पटकथा : मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक)

उत्कृष्ट संवाद : शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची)

उत्कृष्ट गीते : गुरु ठाकूर (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत : राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत : विजय गवंडे (बापल्योक)

उत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वगायिका : प्राची रेगे (गोदाकाठ)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : सुजितकुमार (चोरीचा मामला)

उत्कृष्ट अभिनेता : राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट अभिनेत्री : मृण्मयी गोडबोले (गोदाकाठ)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता : जितेंद्र जोशी (चोरीचा मामला)

सहाय्यक अभिनेता : विठ्ठल काळे (बापल्योक)

सहाय्यक अभिनेत्री : प्रेमा साखरदांडे (फनरल)

प्रथम पदार्पण अभिनेता : ऋतुराज वानखेडे (जयंती)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : पल्लवी पालकर (फास)

 

View this post on Instagram

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा : मंगेश जोशी, अर्चना बोराडे (कारखानिंसांची वारी)

उत्कृष्ट पटकथा : रसिका आगासे (तिचं शहर होणं )

उत्कृष्ट संवाद : नितीन नंदन (बालभारती)

उत्कृष्ट गीते : जितेंद्र जोशी (गोदावरी)

उत्कृष्ट संगीत : अमित राज (झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत : सारंग कुलकर्णी (कारखानीसांची वारी)

उत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (गोदावरी)

उत्कृष्ट पार्श्वगायिका : आनंदी जोशी (रंगिले फंटर)

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : फुलवा खामकर (लक डाऊन Be Positive)

उत्कृष्ट अभिनेता : जितेंद्र जोशी (गोदावरी)

उत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी (तिचं शहर होणं)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता : भालचंद्र कदम (पांडू)

सहाय्यक अभिनेता : अमेय वाघ (फ्रेम)

सहाय्यक अभिनेत्री : हेमांगी कवी (तिचं शहर होणं)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता : योगेश खिल्लारे (इंटर नॅशनल फालमफोक)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : श्रुती उबाले (भ्रमणध्वनी)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : निर्मिती सावंत (झिम्मा)

Tags: Maharashtra State Marathi Film Awardrohini hattangadishivaji satam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi : कॅप्टन झाल्यानंतर निक्कीचं वागणच बदललं, टीमलाही खटकली गोष्ट, जान्हवीसह अरबाजही म्हणाला, "असंच आयुष्य बाहेरही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.