शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला नेटकऱ्याकडून शिवीगाळ, म्हणाली, “आईशीही असंच बोलतो का?”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 10:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abeer gulal serial fame Gayatri Datar abused by netizen acteess shared sreenshot on Instagram

गायत्री दातारला नेटकऱ्याने दिली शिवी, अभिनेत्रीने घेतला चांगलाच समाचार

Bigg Boss Marathi 5 : कलाक्षेत्रात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. काही कलाकार तर आपलं मत अगदी खुलेपणाने मांडताना दिसतात. आताही असंच काहीसं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं नवं सीझन सध्या चांगलंच गाजत आहे. या शोमध्ये होणारे वाद-विवाद याबाबत काही कलाकार आपलं मत मांडत आहेत. निक्की-जान्हवीच्या काही वादग्रस्त विधानांबाबत निषेध व्यक्त करत आहेत. पण बऱ्याचदा कलाकरांना आपलं मत मांडत असताना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ट्रोलर्स अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत पातळी गाठतात. असंच काहीसं आता अभिनेत्री गायत्री दातारबाबत घडलं आहे. (Gayatri Datar abused by netizen)

Endemolshineind ने ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनचे स्पर्धक जय दुधाणे व उत्कर्ष शिंदेसह गायत्रीची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि त्यांची वागणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी गायत्रीला या सीझनमधील “तिचा आवडता स्पर्धक कोण आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गायत्री असं म्हणाली की, “अभिजीत सावंत माझा आवडता स्पर्धक आहे. कारण तो ज्या हुशारीने खेळत आहे, तसा अजून घरात कुणी खेळत नाहीये”. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Endemol Shine India (@endemolshineind)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कोणत्या थराला जाऊन बोलतोय याचं तरी भान ठेवा”, जान्हवी-पॅडीच्या वादावर योगिताच्या नवऱ्याचं भाष्य, म्हणाला, “हसून सॉरी म्हणत…”

या व्हिडीओखाली एकाने आईवरुन शिवी दिली असून यात त्या नेटकऱ्याने “तू डबल ढोलकी आहेस. परवा सूरजची सर्वात मोठी फॅन आहेस असं म्हणाली आणि आता अभिजीत आवडतो असं म्हणत आहेस”. या नेटकऱ्याने शिवीचा वापर केल्याबद्दल गायत्रीने नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. गायत्रीने नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यावर “तुझ्या आईशी पण असंच बोलतोस का रे? हिंमत असेल तर खऱ्या आयडीवरुन येऊन बोलून दाखव”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी लायकी काय?, झक मारुन…”, जान्हवीने पॅडीचा अपमान केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने कठोर शब्दांत सुनावलं, म्हणाली, “तुझं तोंडच…”

दरम्यान, गायत्री सध्या कलर्स मराठीवरीलच अबीर गुलाल या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची टीम गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हजेरी लावली होती.  यावेळी तिच्याबरोबर अक्षय केळकरदेखील होता. यावेळी गायत्रीने सूरज हा तिचा आवडता स्पर्धक असून ती त्याची फॅन असल्याचे तिने म्हटलं होतं. यावरून नेटकऱ्याने ही कमेंट केली आहे.       

Tags: gayatri datarmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Next Post
21 august 2024 Thursday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

21 August Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस फायद्याचा, ठरवलेली सर्व कामे होणार पूर्ण, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.