रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मधील निखिल दामलेचा प्रवास संपला, नेमकं काय चुकलं?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 second eviction Nikhil Damle evicted from the house

Bigg Boss Marathi 5 मधून निखिल दामले हा स्पर्धक पडला घराबाहेर, भावुक होत दिला निरोप

Bigg Boss Marathi 5 : सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व चांगलेच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तसेच त्यांच्यामध्ये सुरु असलेले वाद व भांडणं यामुळे नवीन पर्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच झालेल्या ‘बिग बॉस’च्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. कोणाचे काय चुकले? आणि कोणी काय करायला हवे? या सर्व गोष्टी रितेशने सांगितल्या. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन आज पार पडले असून यात एलिमिनेशनमध्ये निखिल दामले हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. नवीन पर्वातील तीन आठवड्यानंतर निखिल घराबाहेर पडला आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

या आठवड्यात योगिता, निखिल, सूरज व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अरबाज व अभिजीत यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाजने निक्कीला आणि अभिजीतने पॅडी कांबळे यांना नॉमिनेशनपासून वाचवले होते. मात्र वैभव त्याला मिळालेल्या पॉवरमध्ये घन:श्यामला नॉमिनेशनपासून वाचवतो आणि त्याच्याऐवजी अभिजीतला नॉमिनेट करतो. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी निखिलचा या घरातील प्रवास संपला आहे. या घरातील निखिलचा गेम काही दिवस खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा वर्तवल्या जात होत्या आणि या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दर शनिवार व रविवारी होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील स्पर्धकांसाठी व प्रेक्षकांसाठी रितेश कायमच नवनवीन टास्क व खेळ घेऊन येत असतो. तसंच या रविवारी कलर्स वाहिनीच्याच ‘अबिर गुलाल’ या मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. या कलाकारांनी घरातील स्पर्धकांबरोबर एक मजेदार टास्क खेळला आणि या टास्कमध्ये घरातील सर्वच प्रेक्षकांनी सहभाग घेतला. तसंच यावेळी पायलने सूरजला राखीही बांधली. यानंतर रितेशने एक खास रुम उघडली. यात घरातील स्पर्धकांनी एकमेकांविषयीची केलेली चुगली ऐकवून दाखवली. तसंच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही रितेशने ऐकवून दाखवल्या.

दरम्यान, ‘भाऊचा धक्का’मध्ये  घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. अशातच ‘भाऊचा धक्का’ या भागाच्या शेवटी त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि ही नाव होते निखिल दामले.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 second evictionNikhil Damle
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 third eviction yogita chavan evicted from the house

Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.